मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी भलाभल्यांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवी हे जग सोडून निघून गेली आहे.


काय आहे खरं नाव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवींच्या निधनावर कोणालाच विश्वान नाही होत आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. 54 पैकी 50 वर्ष श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं. 13 ऑगस्ट 1963 ला तमिळनाडुच्या शिवकाशीमध्ये श्रीदेवींचा जन्म झाला होता. श्रीदेवीचं पूर्ण नाव श्री अम्मा येंजर अय्यपन असं होतं. सिल्वर स्क्रीनसाठी त्यांनी आपलं नाव श्रीदेवी असं ठेवलं.


इतक्या भाषांमध्ये सिनेमे


श्रीदेवींनी त्यांची सुंदरता, अभिनय, अदा यांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बनवलं. भारतीय सिनेमांच्या हिंदी शिवाय तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड या भाषेतील सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 80 आणि 90 च्या दशकात श्रीदेवी सुपरस्टार बनल्या.