मुंबई : कुंवारी आपने छोड़ा नहीं, श्रीमती किसी ने बनाया नहीं..' 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात मुंबईत बॉलिवूडमध्ये करियर करण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या गंगाचं आयुष्य कसं बदललं दाखवलं आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात अभिनेत्री आलिया भट्टने गंगूबाई ही भूमिका साकारली. सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमात आलियाने उत्तम अभिनय करत गंगूबाईचं संघर्ष जगासमोर आणलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी तिला अनेकांकडून कौतुकाची थाप देखील मिळाली. गंगूबाई यांच्या भूमिकेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता खऱ्या गंगूबाई यांच्या तरुणाईचा फोटो व्हायरल होत आहे. 



खऱ्या आयुष्यात गंगूबाई कशा दिसत होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला त्याचे खरे फोटो दाखवणार आहोत. गंगूबाईंचे खरे नाव गंगा जगजीवनदास काठियावाड होते. 


गंगा जीवनदास काठियावड नावाची एक मुलगी... रमणीक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते... बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी घेवून रमणीकसोबत मुंबईत येते... तो दिवस आणि ती  गंगाची गंगू होते.... त्यानंतर गंगूची गंगूबाई...