मुंबई : प्रेम Love ही एक अशी भावना आहे, जी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही ती लपवता येत नाही. ही भावनात असते मुळात दिलखुलासपणे व्यक्त करण्यासाठी. या अतिशय निर्मळ अशा भावनेच्याच बळावर एका लोकप्रिय गायकानं थेट एका रिऍलिटी शोच्या माध्यमातूनच त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली आहे. तेसुद्धा लाखो प्रेक्षकांच्या साक्षीनं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावनांचा काहूर माजलेल्या या क्षणाची झलक सध्या सोशल मीडियावर अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे. माझ्याशी लग्न करशील का, मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय असं म्हणत असताना या गायकाच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जात आहेत. तुम्हालाही पडला ना प्रश्न हा गायक आहे तरी कोण? 


आपल्या आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाता ठाव घेणारा हा गायक आहे, राहुल वैद्य Rahul Vaidya. Bigg Boss 14  'बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्ये सध्या स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राहुलनं त्याची प्रेयसी, अभिनेत्री दिशा परमार Disha Parmar हिला प्रपोज propose केलं.



 



सोशल मीडियावर या क्षणाची एक लहानशी झलकही दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये राहुलच्या मनात असणारं दडपणही स्पष्टपणे पाहता येत आहे. पण, त्याचा आनंद या क्षणाला इतरांची मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे आता राहुलच्या या प्रपोजलवर दिशाचं काय उत्तर असणार हे जाणून घेण्यासाठीसुद्धा चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.