मुंबई : जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नातं आणखी घट्ट होत असतानाच अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली. ज्याप्रमाणे प्रत्येत नातं तुटण्यामागे काही कारणं असतात अगदी त्याचप्रमाणे बी- टाऊनच्या या सेलिब्रिटी जोडीचं नातं तुटण्यामागेही असंच कारण समोर आलं आहे. (reason revealed Bollywood Actress Disha patani and tiger shroff break up)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून टायगर आई- वडील आणि बहिण अशा कुटुंबापासून दूर राहत आहे. दिशाही त्याच्यासोबत राहत असल्याचं म्हटलं गेलं. नात्यात काही काळ एकत्र राहिल्यानंतर आपण लग्नबंधनात अडण्याच्या विचारानं तिच्या मनात घर केलं. 


तिचा एक प्रश्न आणि नात्याला तडा... 
सूत्रांच्या माहितीनुसार दिशानं टायगरशी लग्नाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं हा मुद्दा टाळला. 'आता नाही...' अशा शब्दांत उत्तर देत त्यानं दिशाला नकारार्थी प्रतिसाद दिला. 


सध्या दिशा या नात्याला लग्नाच्या वळणावर नेण्यास उत्सुक होती, पण टायगर मात्र त्यासाठी तयार नव्हता परिणामी या नात्याला पूर्णविराम लागला. अनेक नाती या एका प्रश्नावर तुटल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलंही असेल. टायगर आणि दिशाच्या नात्यावरही हीच वेळ आली. 


टायगरच्या वडिलांनीच दिलेला इशारा 
टायगर श्रॉफचे वडील, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी काही महिन्यांपूर्वीच यंदाच्या वर्षी आपल्या मुलाचे लग्नाचे कोणतेही बेत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हे तेच दिवस होते जेव्हा टायगर आणि दिशाच्या लग्नाच्या चर्चांचं वादळ पाहायला मिळालं होतं.


'त्याचं लग्न कामाशी झालंय. सध्या तो कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यानं जर लग्न करण्याचा कोणताही निर्णय घेतला तर तो त्यावर लक्ष देईल', असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.