मुंबई : रणवीर सिंह त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात  रणवीर सिंहसोबत नेमकी कोणती अभिनेत्री असणार यासाठी स्पर्धा तगडी होती. मात्र काही दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या नावाची घोषणा करण्यात आली.  


जान्हवी कपूरचं नावही स्पर्धेत       


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टपासून  जान्हवी कपूरपर्यंत अनेकजणींची नावं या स्पर्धेमध्ये आघाडीवर होती. मात्र करण जोहरने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटनुसार, सारा अली खानच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


जान्हवी हातातून का गेला 'सिम्बा' ? 


मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, जान्हवी  कपूरच्या हातातून 'सिम्बा' हा चित्रपट जाण्यामागे तिच्याच काही चूका आहेत. 'सिम्बा'ची स्क्रिप्ट जान्हवी आणि साराला ऐकवण्यात आली होती. दिग्दर्शक रोहित शेट्टीची पहिली पसंती जान्हवीला होती. चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमकडून अभिनेत्रीचं नाव ठरवण्यापूर्वीच जान्हवी कपूरने 'सिम्बा' चित्रपट ऑफर झाल्याची माहिती दिली. ही बातमी लीक झाल्यानेच 'सिम्बा' जान्हवीच्या हातातून गेल्याची माहिती मिळणार आहे. 


जान्हवीची चूक? 


जान्हवीने चित्रपट साईन करण्यापूर्वीच रणवीरसोबत काम करणार असल्याने नर्व्ह्स झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवीचा हा 'अनप्रोफेशनल' अ‍ॅडिट्युड रणवीरला आवडला नसल्याने त्याचा फटका जान्हवीला पडला. 


सारा खान करणार डेब्यू 


सैफ अली खानची मुलगी सारा अली खानला 'सिम्बा' हा चित्रपट ऑफर झाला तरीही 'केदारनाथ' या चित्रपटातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सारा सुशातसिंग रजपूतसोबत काम करणार आहे. तर धर्मा प्रोडक्शनच्या 'धडक' चित्रपटातून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.