मुंबई : आधी ‘पहरेदार पिया की’आणि आता ‘द कपिल शर्मा शो’हे सोनी टिव्हीवरील दोन कार्यक्रम बंद होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द कपिल शर्मा शो’ला काही दिवसांसाठी ब्रेक देण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. 


कपिलची तब्येत बरी नसल्याने अनेक सेलिब्रिटी त्याच्या सेटवरुन परतल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नसल्याने वाहिनीला काही जुने एपिसोड प्रसारित करुन प्रेक्षकांना निराश करु नये यासाठी काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘सुपर डान्सर’हा रिअॅलिटी शो ‘द ड्रामा कंपनी’च्या वेळेत  रात्री ८ वाजता प्रसारित होईल. तर ‘द ड्रामा कंपनी’ कपिलच्या शोच्या वेळेत म्हणजे रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येईल. कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख- अनुष्का, अक्षय- भूमी, अर्जुन कपूर- अनिल कपूर या सेलिब्रिटींना एपिसोड शूट न करताच परतावे लागले होते. तर गेल्याच आठवड्यात ‘बादशाहो’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलेल्या अजय देवगण, इशा गुप्ता आणि इलियाना डिक्रूझ शूट करु न शकल्याने परतले होते.