मुंबई :  80 च्या दशकामध्ये लेखक भा. रा. भागवत यांनी 'फास्टर फेणे' वाचकांच्या भेटीला आणला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता २१ व्या शतकातील टेक्नोसॅव्ही फास्टर फेणेचं रूप आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'फास्टर फेणे' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. सस्पेंस थ्रिलर बाजातील हा सिनेमा मराठीतील हटके पण यशस्वी प्रयत्न ठरला आहे. मग यंदाच्या विकेंडला हा चित्रपट या '७' कारणांसाठी नक्की पहाच ...  


1. नायक अमेय वाघ - 


अभिनेता अमेय वाघ या चित्रपटात 'फास्टर फेणे' ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. आजपर्यंत अमेय वाघचे मोठे डोळे यावर अनेक विनोद झाले होते. मात्र 'फास्टर फेणे' या चित्रपटामध्ये दिग्दर्शकाने अमेय वाघच्या डोळ्यांचाच अत्यंत प्रभावशाली वापर केला आहे. 


2. खलनायक गिरीश कुलकर्णी -  
गिरीश कुलकर्णी हा अष्टपैलू कलाकार आहे. त्याच्या अनेक भूमिका गाजल्या. पण 'फास्टर फेणे' चित्रपटामध्ये 'आप्पा' हे खलनायकाचे पात्र गिरीश कुलकर्णीने अत्यंत दमदारपणे निभवले आहे. फास्टर फेणे नायक असला तरीही तो उठून येण्यासाठी गिरीश कुलकर्णीने साकारलेला क्रुर 'आप्पा' हे एक महत्त्वाचं कारण आहे.  


3. साहसकथेमागील गोष्ट -  
'फास्टर फेणे' ही एक साहस कथा असली तरीही त्याला आजच्या काळातील वास्तवाची पार्श्वभूमी आहे. शिक्षणव्यवस्थेला लागलेली कीड, आजची शिक्षण पद्धती यावर लेखकाने मार्मिक भाष्य केलं आहे. त्याबद्दल आजचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षणव्यवस्थेने विचार करणं गरजेचे आहे. 


4.चित्रपटाचे लेखन - 


आजच्या प्रेक्षकांसमोर  फास्टर फेणे तितक्याच ताकदीने  उभा करण्याचं काम लेखक क्षितिज पटवर्धन याने उत्तम केले आहे. पूर्वी ज्यांनी 'फास्टर फेणे' वाचला आहे त्यांचीदेखील क्षितिजने अपेक्षापूर्ती केली आहे. तसेच नव्या पिढीसमोरही हा अवलिया तितक्याच ताकदीने उभा केला आहे. 'फास्टर फेणे'तील क्षितिजने लिहलेले काही संवाद तुम्हांला नक्कीच अंतर्मुख करणार आहेत.


5. बॅकग्राऊंड म्युझिक -  


फास्टर फेणेमध्ये एकही गाणं नाही. तरीही या चित्रपटाच्या संगीताचे कौतुक होत आहे. याचं कारण म्हणजे 'बॅकग्राऊंड म्युझिक'. फास्टर फेणेला प्रभावशाली बनवण्यामध्ये या सिनेमाचं 'बॅकग्राऊंड म्युझिक' एका पात्राप्रमाणेच महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर अनेकांच्या ओठी याचे काही सूर नकळत राहतात. 


6. ड्रोनच्या मदतीने पहा कसं दिसतं पुणं ? 
फास्टर फेणेमध्ये काही सीन ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून पुण्याचं भव्य दिव्य रूप पाहणं हा अनुभव थक्क करणारा आहे. काही मोजकेच पण हे सीन चित्रपटाला प्रभावी करत आहेत. 


7. चित्रपटाचा वेग - 
क्षितिज पटवर्धनच्या लिखाणाला आदित्य सरपोतदार याने केलेल्या दिग्दर्शनामुळे उत्तम जोड मिळाली आहे. या चित्रपटामध्ये आगाऊ स्टंटबाजी नाही, भरकटणारी कथा नाही. झटपट वेगाने घडणार्‍या तर्कशुद्ध घडामोडींमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. 


पहा काय आहे फास्टर फेणेचा मुव्ही रिव्ह्यू