Pradhyuman Maloo : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय असलेल्या ‘इंडियन मॅचमेकिंग’ या सीरिजचा 3 सीजन नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना या सीरिजचं जणू वेड लावलं आहे. या मालिकेच्या रिअॅलिटी शोमध्ये जगभरातून अनेक लोक तिथे आपल्याला पाहायला मिळाले. या क्लायंट्सचं लग्न लावून देण्याचं किंवा मग अरेंज मॅरेज ही प्रोसेस समजवून सांगण्याचं काम सीमा तपारिया करतात. सीमा तपारिया फक्त भारतात नाही तर परदेशातील अनेक अविवाहीत लोकांना लग्न करण्यासाठी एक चांगला जोडिदार शोधून देण्यास मदत करताना दिसतात. पण त्यांनी या कार्यक्रमात एक जोडी बनवली होती. ते जोडपं तुटलं आहे असं म्हणता येईल. ते कोणतं जोडपं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रद्युम्न आणि आशिमा यांची जोडी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘इंडियन मॅचमेकिंग’ विजेता प्रद्युम्न मालूवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. प्रद्युम्ननं ‘इंडियन मॅचमेकिंग’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. या शोमध्ये त्यानं एक- दोन नाही तर तब्बल 150 मुलांना लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर अखेरीस त्याला एक मुलगी भेटली. ती म्हणजे मॉडेल आणि अभिनेत्री आशिमा चौहान. आशिमा आणि प्रद्युम्न यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये लग्न केलं. आता वर्षभराच्या आत आशिमानं पती प्रद्युम्न विरोधात FIR दाखल करत घरगुती हिंसाचाराचे आरोप केले



मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिमा चौहाननं गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रद्युम्नच घर सोडलं होतं. आशिमाचे वकील अनमोल बरतारिया याविषयी बोलताना म्हणाले की नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गंभीर आरोप आहेत. हे घरगुती हिंसाचार आणि सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचारासारख्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. याशिवाय आशिमा आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यासही तयार आहे. आशिमाच्या वकिलाने सांगितले की, आशिमा सध्या तिच्या कुटुंबासोबत बेंगळुरूमध्ये राहत आहे. तर ती सध्या काही बोलण्याच्या स्थितीत नाही.'



हेही वाचा : जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...


दुसरीकडे प्रद्युम्न म्हणाला की 'त्याला या विषयी काहीही माहिती नाही. मला जितकं माहित आहे, त्याप्रमाणे हीच गोष्ट आहे की आम्ही वकीलांसोबत या प्रकरणात सेटलमेंट करत आहोत आणि या गोष्टीला चांगल्या पद्धीतीनं सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.'