Rekha At Janhvi Kapoor's Movie Premiere : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझ' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याच्याआधी म्हणजे काल 1 ऑगस्ट रोजी चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. जान्हवी कपूरच्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी रेखा या देखील पोहोचल्या होत्या. तर त्यांचा व्हिडीओ पाहून सगळेच त्यांची स्तुती करत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की रेखा या जान्हवी कपूरसोबत दिसत आहेत. तर त्याशिवाय जान्हवीवर त्यांनी प्रेम व्यक्त केल्याचं देखील यात पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी आणि रेखा यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ जान्हवीच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा आहे. रेखा या गुलाबी साडी नेसत जान्हवी आणि गोल्डन बॉर्डरच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की जान्हवी ही रेखा यांचा हात पकडून पोज देताना दिसत आहे. तर रेखा या जान्हवीला मिठी मारताना दिसत आहे. रेखा यांनी ज्या प्रकारे जान्हवीवर असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं त्याची सगळेच स्तुती करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रेखा आणि जान्हवी यांचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना श्रीदेवी यांचा आठवण आली आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की आज श्रीदेवी इथे असायला हव्या होत्या. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की रेखा जींनी आईसारखं प्रेम केलं. खूप चांगलं वाटलं. तिसरा नेटकरी म्हणाला, रेखा जी आणि श्रीदेवी जी या चांगल्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे रेखा जी मावशीच्या भूमिकेत जान्हवीला पाठिंबा देणं हे सहाजिक होतं... त्या जान्हवीला आईसारख्या आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, रेखा जी आज श्रीदेवी जी यांच्या प्रमाणे जान्हवीला प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी आल्या... त्यांच्या डोळ्यात ती मातृत्वाचं ते प्रेम दिसतं. 


हेही वाचा : 'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


दरम्यान, जान्हवी कपूरच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यात तिच्यासोबत गुलशन देवैया देखील दिसत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर ही सगळ्यात कमी वयाच्या कमिश्नर सुहाना भाटियाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात जान्हवी कपूरला कमी वयातं इतकी मोठी पोजिशिन मिळाल्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. तर ती या पदासाठी योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी ती संघर्ष करताना दिसते.