मुंबई : रेखा यांचं नाव घेतलं की, सर्वात आधी समोर येतात ते बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन (Amitabh bachchan). कारण या दोघांची केमेस्ट्री सिनेमांमध्ये जितकी चर्चेत आली होती. तितकीच ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ही चर्चेत होती. अमिताभ यांनी रेखा सोबतचे नाते कधीच सार्वजनिक ठिकाणी स्वीकारले नाही. पण रेखा यांनी आपल्या प्रेमाबद्दल अनेकदा कबुली दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रेखाने नेहमीच आपल्या अभिनयाने लोकांना आश्चर्यचकित केलं, मग ते स्ट्राँन्ग किंवा कठीण पात्र साकारणं असो किंवा त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन करणं असो. रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले ज्याची खूप चर्चा झाली. मग ते ओम पुरीसोबत असो किंवा अक्षय कुमारसोबत. रेखा यांनी एक सिनेमा केला ज्याच नावं होतं उत्सव. रेखा यांनी शेखर सुमनसोबत चित्रित केलेल्या बोल्ड आणि इंटिमेट सीन्सने हा चित्रपट भरलेला होता. त्याचबरोबर ओपनिंग सीनमध्ये असं काही घडलं ज्यामुळे रेखा जोर-जोरात ओरडू लागल्या.  


शेखर सुमन 8 वर्षांनी लहान होते
'उत्सव' हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा रेखा मोठ्या स्टार बनल्या होत्या. शेखर सुमनच्या करिअरला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती, या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन्स होते, त्यामुळे शेखर सुमन खूप  घाबरले होते, ते टेन्शनमध्ये आले होते की, एवढ्या मोठ्या स्टारसोबत इंटीमेट सीन कसे देणार मात्र याच तणावात ती सराव करायला विसरले नाही.


एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी सांगितलं की, ते उशी घेऊन त्या सीन्सची रिहर्सल करून आलो होते. नर्व्हस असूनही त्यांनी रेखासोबत सात सीन करण्याचं धाडस दाखवलं, मात्र शेखर यांनी रेखाला आपल्या मिठीत घेताच त्या जोरजोरात ओरडू लागल्या.


या कारणामुळे रेखा म्हणाल्या होत्या कट
हा सीन करत असताना शेखर सुमन यांनी रेखाला आपल्या मिठीत घेताच रेखा जोरजोरात ओरडू लागल्या. खरंतर, रेखा यांना वाटलं की, अभिनेता हा सीन अतिशय प्रोफेशनली करत आहे. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितलं होतं की, सकाळपासून उशा घेऊन सराव करणाऱ्याला तो प्रोफेशनल सीन कसा देणार नाही. तसं, या चित्रपटापूर्वी रेखा यांनी अनेक वेळा बोल्ड सीन दिले होते, तिने वयाच्या १५ व्या वर्षी पहिला किसिंग सीन दिला होता.