पतीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीसोबत Live in Relationship; रेखाबाबत धक्कादायक खुलासा
Rekha Live in Relationship: रेखा आपल्या अभिनयासोबतच आपल्या रिलेशनशिपसाठीही ओळखली जाते. त्याचसोबत आता तिच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यावेळी ती त्याच व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये आहे जी व्यक्ती तिच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत होती.
Rekha Live in Relationship: अभिनेत्री रेखा या आपल्या सदाबहार अभिनयासाठी ओळखली जाते. रेखाच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा नानातऱ्हेचे खुलासे करण्यात आले आहे. आता तिच्याबद्दल असाच एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तिच्यावरील एका बायोग्राफीमध्ये लेखानं जे लिहिलंय ते ऐकून कदाचित आपल्या सर्वांनाच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यावेळी तिच्या बायोग्राफीमध्ये ती एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे रेखाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 1990 साली मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखानं आपला लग्नसोहळा पार पाडला होता. परंतु त्याच वर्षी मात्र मुकेश आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं होतं. त्यामुळे त्यानंतर रेखाच्या सुखीसंसाराला एक वेगळेच ग्रहण लागले होते. आज आपल्या पतीच्या या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी पुढे झाली आहे.
पती मुकेशच्या निधनाला जबाबदार यापासून ते रेखाच्या बेडरूममध्ये फक्त याच व्यक्तीला प्रवेश आहे अशी या व्यक्तीची ओळख आहे. मोलकरीणीलाही तिच्या बेडरूममध्ये प्रवेश नाही. ती व्यक्ती नक्की कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या व्यक्तीचे नावं आहे फरजाना. ही तिची पर्सनल सेक्रेटरी आहे. लेखक यासीर उस्मान यानं लिहिलेल्या 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी'मध्ये रेखा ही सेक्रेटरी फरझानासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Video: '11 वर्षांची होऊनही...' Airport वर दिसताच आराध्या बच्चन ट्रोल, सगळ्यांचं लक्ष तिच्या केसांवर
नक्की या पुस्तकात काय म्हटलंय?
या पुस्तकातून लेखकानं लिहिलंय की, ''फरझाना रेखासाठी एक परफेक्ट पार्टनर आहे. ती तिची सल्लागार आहे. तिची मैत्रीण आणि तिची सपोर्टरही आहे. रेखा तिच्याशिवाय जगू शकत नाही. फक्त रेखाची विश्वासू सेक्रेटरी फरझाना जिला काहींनी तिची प्रेयसी असल्याचा दावा केला आहे फक्त तिला रेखाच्या बेडरूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणीलाही रेखा तिच्या बेडरूमध्ये प्रवेश करू देत नाही.''
यात पुढे म्हटलंय की, ''फरझाना रेखाच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवते. ती एक उत्तम गेटकिपर आहे आणि रेखाला येणाऱ्या प्रत्येक कॉलवर तिचं लक्ष असतं. रेखानं आपल्या आयुष्यातील गूढ कायम ठेवलं असून यात फरझाना तिला मदत करते''.
यावेळी या पुस्तकात असंही म्हटलंय की, रेखाच्या पतीच्या आत्महत्येमागे फरझाना कारणीभूत आहे. त्यातून जी सुसाईड नोट मुकेश यांची सापडली होती त्यावरून रेखाच्या पतीनं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवले नव्हते. त्यातून अनेकांनी रेखावरही आळ घेतला होता.