Rekha : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांचे आजही लाखो चाहते आहेत. रेखा यांचं कुटुंब हे अभिनय क्षेत्रातून होतं. त्यांचे वडील जेमिनी गणेशन हे देखील त्यांच्याकाळातील लोकप्रिय अभिनेते होते. पण असं असलं तरी रेखा यांना कधीच वडिलांचं प्रेम मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अखेर जाऊन अरेंज मॅरेज केलं. तरी देखील त्यांचं आयुष्य हे स्थिर झालं नाही. रेखा यांनी एका कार्यक्रमात त्याच्या लग्नाविषयी वक्तव्य केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांशी नावं जोडली गेली. रेखा यांनी सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शो ‘रान्डिवू विद सिमी ग्रेवाल’ मध्ये मुकेश अग्रवाल यांच्यासोबतच्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी बोलताना म्हणाल्या, 'आम्ही कसे भेटलो हे महत्त्वाचं नाही, गरजेचं हे आहे की मी त्या लग्नातून काय शिकले. खरंतर जेव्हा मुकेश अग्रवाल यांचे निधन झाले त्यानंतर त्या शांत झाल्या होत्या.' त्यांच्याविषयी प्रश्न विचारता रेखा म्हणाल्या की 'मुकेश हे लाजाळू होते. कोणत्याही घटनेतून बाहेर येण्यात ते यशस्वी होते.' 


पुढे सिमी ग्रेवाल म्हणाल्या की 'मी कधी ऐकलं नाही की रेखा नशा करते.' त्यावर रेखा म्हणाल्या, 'मी देखील नशा करायचे. मी ड्रग्स घेतलेत. मी अपवित्र आहे आणि माझ्यात खूप वासना आहे. पण जर तुम्ही विचारलं की सगळं कोणासाठी आहे तर फक्त आयुष्याकडून आहे.' 


रेखा यांच्या या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली होती. त्यांची अशीच स्पष्ट उत्तर देण्याची वृत्ती सगळ्यांना आवडायची. अमिताभ बच्चन यांच्यासाठी असलेलं त्यांच्यात असलेल्या प्रेमाविषयी सगळ्यांना माहित आहे. रेखा-अमिताभ सगळ्यात शेवटी 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी ही चर्चेचा विषय ठरली होती. अमिताभ बच्चन यांच्यासाठी रेखा यांनी केलेल्या वक्तव्यांची आजही चर्चा होते. इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, रेखा यांनी 1984 मध्ये ‘फिल्मफेयर’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना आधी अमिताभ यांनी त्या दोघांच्या नात्याला दिलेल्या नकारावर विचारण्यात आलं. त्यावेळी रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी असलेल्या भावना सांगितल्या होत्या. 


हेही वाचा : लोकप्रियता, कोटींची संपत्ती आणि सगळं काही..., तरी अपूर्णच ऋषी कपूर यांच्या 'या' 2 इच्छा


रेखा यांनी अमिताभ बच्चन यांची बाजू घेत सांगितलं होतं की 'त्यांनी त्यांच्या आणि कुटुंबाचा आदर तसाच रहावा यासाठी नात्याला नकार दिला होता. पण हे देखील मान्य केलं की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. जर माझ्यासमोर त्यांनी अशी रिअॅक्श दिली असती, तर मला फार वाईट वाटलं असतं. पण त्यांनी कधी असं केलं? मी तुम्हाला विचारते. मग अशा परिस्थितीत मी का या सगळ्याचा विचार करु की ते लोकांसमोर काय म्हणाले? मला या गोष्टीची कल्पना आहे की बिचारी रेखी, त्याच्या प्रेमात वेडी आहे, तरी बघा. जोपर्यंत मी या व्यक्तीसोबत आहे. तोपर्यंत मला काही चिंता नाही. मी स्वत: दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहू शकत नाही.'