मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांनी एकत्र अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर रील लाईफमध्येच नाही तर रियल आयुष्यातही या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. एका मुलाखतीदरम्यान, अभिनेता आणि दिग्दर्शक रंजीत यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरबद्दल खुलासा केला. रंजीत म्हणाले रेखा यांच्या एका विनंतीमुळे 1990 साली 'कारनामा' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंजीत यांना दिग्दर्शकासोबतच बॉलिवूडचा सर्वात खलनायक म्हणूनही ओळखले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रंजीत यांना तो काळ आठवला, जेव्हा त्यांनी रेखा यांच्या जागी 'करनामा' सिनेमात दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं. तेव्हा रेखा आणि बिग बींच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती. 



त्यामुळे संध्याकाळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून रेखा यांना सकाळीचं शूटिंग पूर्ण करायची होती. रंजीत म्हणाले, 'एक दिवस रेखा यांनी फोन केला आणि विनंती केली की मी सकाळच्या शिफ्टला काम करू शकते का? कारण मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत संध्याकाळ घालवायची आहे.'


पण रेखा यांच्या शेड्युलिंगच्या समस्यांमुळे,  'करनामा'मध्ये रेखा यांच्या ऐवजी अभिनेत्री अनिता राजला कास्ट करण्यासाठी सांगितलं. अखेर, शेवटी विनोद खन्ना आणि फरहा नाझ यांना घेऊन 'कारनामा' सिनेमा पूर्ण झाला.