मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत.


तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. दरम्यान अर्जुन कपूर आणि श्रीदेवीच्या नात्यातील दुरावा असल्याची चर्चाही समोर येत आहे.


श्रीदेवी सावत्र आई 


श्रीदेवी ही दिग्दर्शक बोनी कपूर यांची दुसरी पत्नी. अंशुला आणि अर्जून कपूर हे बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपुर यांची मुलं आहेत.


श्रीदेवी ही नात्याने अर्जुनची सावत्र आई.  श्रीदेवी आणि बोनी यांच्या लग्नानंतर काही दिवसांनी मोना यांच निधन झालं. 


कुठे होता अर्जुन कपूर ?


श्रीदेवी यांच्या मृत्यूसमयी अर्जुन कपूर अमृतसरला होता. माहिती मिळताच तो मुंबईसाठी रवाना झाला. 


नातं अस्तित्वात नाही 


आमची गाठभेट कधी होतं नाही. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवत नाही. त्यामुळे आमचं नातं अस्तित्वात नाही असं अर्जुन कपूर यानं म्हटलं होतं. 


कोणाचा अपमान करु नये अशी शिकवण मला माझ्या आईने दिल्याचेही अर्जुनने म्हटले होते. 


मोना कपूर यांच्या मृत्यूनंतर अर्जून खूप भावूक झाला. माझी ओळख बनलेली बघायला आई नाहीये असे त्याने म्हटले होते.