मुंबई : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम 24 जूनपासून 'झी मराठी' या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे आपल्या सगळ्यांनाच आता माहिती आहे. आता या पर्वाचं टायटल साँग आपल्या भेटीला आलं आहे. या पर्वाचं शिर्षक गीत प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.  या गाण्याला यामधील चिमुकल्यांनी आवाज दिला असून या शिर्षक गीताला वादन देखील यातील चिमुकल्यांनी दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे या पर्वात चिमुकलेच वाद्य वाजवणार आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या स्पर्धेत एलिमिनेशन होणार नाहीय. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही, तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील. तर आपले लाडके पंचरत्न हे ज्युरीच्या भूमिकेतून या पर्वात देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 



सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या या नवीन पर्वात 4 छोटे वादक मित्र संगीताची साथ देताना दिसतील. यात कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटील, नाशिकचा 11 वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डे,  कोल्हापूरचा सोहम सचिन जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसेल. तर औरंगाबादचा सोहम उगले हा प्रेक्षकांना कार्यक्रमात संबळ वाजवताना दिसेल, 


झी मराठी वरच्या सारेगमप लिटील चॅम्प्सच्या पर्वाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडला होतं...12 वर्षापूर्वीचे लिटील चॅम्प्सचे पंचरत्न आता पुन्हा एकदा लिटील चॅम्प्सच्या नव्या अर्थात तिस-या सिझनमध्ये दिसणार आहेत. मात्र त्यावेळचे हे स्पर्धक चक्क यावेळी परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेत. एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताना निश्चितच त्यांच्यावर दडपण आहे. 


मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आणि आपण जेवढं काही आपल्या पर्वात शिकलो...त्यानंतर शिकत आलोय. ते सर्व काही या नव्या दम्याच्या छोट्या गायकांना ताई-दादाच्याच रुपात द्यायचं असं ध्येय्य या पंचरत्नांनी ठरवलंय..., आणि म्हणूनच ही नवी जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्राचे  लिटील चॅम्प्स परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.. मात्र रसिकांसाठी, संगीत प्रेमींसाठी आता पुन्हा एकदा सारेगमपचे सूर घुमणार...पुन्हा एकदा गाईन गीत  सुरेल नवे...हे रसिकांचे मन रिझवे...असं म्हणत घराघरातली कामं थांबणार हे नक्की...कारण महाराष्ट्राचे लाडके लिटील चॅम्प्स ठरवणार आहेत उद्याचे लिटील चॅम्प्स...