बॉक्स ऑफिसवर गाजलेला `हा` चित्रपट: 100 कोटींचं बजेट अन् पहिल्याच दिवशी 164 कोटींची कमाई!
India`s Biggest Blockbuster Of All Time: आजकाल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी रुपयांची कमाई करणे सामान्य झाले आहे. मात्र 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या `या` चित्रपटाने सर्व विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजावाजा केला.
पहिल्या दिवशीचा विक्रम
2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या 'या' चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल 164 कोटी रुपयांची कमाई केली. हा कन्नड सिनेसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला असून, त्याने प्रदर्शित होताच अनेक विक्रम मोडले.
ब्लॉकबस्टर चित्रपट
'बाहुबली 2' ने 526 कोटींची कमाई केलेला विक्रम मोडून 'केजीएफ 2' ने पहिल्याचं आठवड्यात 552 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने हिंदी वर्जनमध्ये पहिल्याच दिवशी 52 कोटी रुपये इतकी कमाई केली. जी आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी डब चित्रपटांपैकी एक आहे.
यशचा अभूतपूर्व अभिनय
या चित्रपटाचे मुख्य पात्र 'रॉकी भाई' साकारणाऱ्या यशने संपूर्ण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'केजीएफ चॅप्टर 1' मुळे यशने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि दुसऱ्या भागाने तर यशाला भारतीय स्तरावर सुपरस्टार बनवला.
रेकॉर्ड्स
पहिल्या दिवशी जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट केजीएफ 2' ठरला. सर्वाधिक जलद 100 कोटी कमावणारा हा दुसरा चित्रपट आहे. 'बाहुबली 2' पहिल्या क्रमांकावर आहे. हिंदी वर्जनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दाक्षिणात्य चित्रपट आहे. ओपनिंग विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.
का ठरला 'केजीएफ 2'खास?
'केजीएफ चॅप्टर 2' केवळ कथा आणि अभिनयासाठीच नव्हे, तर त्याच्या भव्य निर्मितीसाठी आणि अप्रतिम अॅक्शन दृश्यांसाठी देखील ओळखला जातो. चित्रपटाच्या यशाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला एक नवीन उंची दिली आहे.
2022 मध्ये रिलीज झालेला 'केजीएफ चॅप्टर 2' हा भारतातील सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने संपूर्ण देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपली छाप सोडली.