Suhani Bhatnagar Death : `तू नेहमी आमच्या हृदयात..`, दंगल फ्रेम `सुहानी भटनागर`च्या मृत्यूनंतर आमिर खान भावूक!
Suhani Bhatnagar Death News : फक्त 19 व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने आमिर खानला (Aamir Khan) देखील धक्का बसलाय.
Aamir Khan Statement Over Suhani Bhatnagar Death : बॉलिवूडला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आमिर खान याचा सुपरहिट सिनेमा 'दंगल' मधील (Dangal Movie) लहान बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहानी आजारी असल्याने तिच्यावर एक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही तिला वाचवण्यात अपयश आलं. चुकीच्या गोळ्यांमध्ये तिच्यावर साईट इफेक्ट दिसून आले अन् शरिरात पाणी साचलं. त्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. एक्समध्ये दाखल करून देखील तिला वाचवण्यात अयपश आलंय. अशातच फक्त 19 व्या वर्षी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने आमिर खानला (Aamir Khan) देखील धक्का बसलाय.
आमिर खानने सुहानी भटनागर हिच्या निधनावर (Suhani Bhatnagar Death) प्रतिक्रिया दिली आहे. आमिर खानने दंगल सिनेमामध्ये सुहानी भटनागरच्या म्हणजेच बबिता फोगाटच्या वडिलांची भूमिका साकारली होती. निधनाची बातमी ऐकताच आमिर खानला देखील शॉक झाला. त्यानंतर आमिर खानच्या प्रोडक्शन टीमने एक स्टेटमेंट पोस्ट (Aamir Khan Statement) केलंय.
काय म्हणाला आमिर खान?
आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दुःख झालं. तिची आई पूजाजी आणि संपूर्ण कुटुंबाला आमच्या मनःपूर्वक संवेदना आहेत. एवढी प्रतिभावान तरुणी, अशी टीम प्लेयर, दंगल सिनेमा सुहानीशिवाय अपूर्ण राहिला असता, अशी भावना आमिर खानने व्यक्त केली आहे. सुहानी, तू नेहमी आमच्या हृदयात एक स्टार म्हणून राहशील. तुला शांती लाभो, असं आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसकडून ट्विट करण्यात आलंय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुहानीचा एक अपघात झाला होता. त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचार घेतल्यानंतर सुहानी ठिक होईल, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिला काही औषधे देण्यात आली होती. ज्या औषधांची रिअॅक्शन झाली. सुहानीच्या संपूर्ण शरीरात पाणी साचलं गेलं. शरीरात पाणी भरल्यामुळं तिची प्रकृती बिघडली. शेवटी डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णलयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुहानीने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, ती जाहिरात करत होती. सोशल मीडियावर देखील ती फारशी अॅक्टिव नसल्याचं पहायला मिळालं होतं.