मुंबई : अभिनयासोबतच सोशल मीडियावर खास चर्चेत असणारे कलाकार, जे आपल्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी ते स्वतःबद्दल असं काही सांगतात. जे त्यांच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल वेड लावतं. आता आम्ही अनुपम खेर यांच्याबद्दल बोलत आहोत ज्यांनी नुकताच अतिशय संस्मरणीय आणि सुंदर फोटो शेअर केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्स बघायला मिळतायेत. अनुपम खेर यांनी नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत, प्रत्यक्षात तो फोटो नसून ते ओळखपत्र आहे. हे दोन्ही फोटो शेअर करत अनुपम यांनी लिहिलं की,  "मला एनसीसी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक दिवस उशीर झाला आहे. पण मला हे सांगायचं आहे की, माझं पहिलं ओळखपत्र NCC दिनांक 16-12-1971 चं होतं. माझ्या ऑफिसच्या डेस्कवर हे एकमेव फ्रेम केलेला फोटो आहे.  



ग्राउंड आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी एक उत्तम रिमाइंडर प्रमाणे, धन्यवाद आणि NCC चे अभिनंदन" या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना अभिनेत्याला ओळखताही येत नाही. त्याचबरोबर चाहते त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. अनुपम खेर यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 500 हून अधिक चित्रपट केले आहेत. सोशल मीडियावर त्यांची खास अॅक्टिव्हिटी पाहायला मिळते. ते सरकारच्या धोरणांवर तसेच बॉलीवूड, हॉलीवूड आणि वर्तमान विचारांवर आपले मत देताl.