मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हॉलिवूडनंतर आता कोरोना व्हायरसची झळ बॉलिवूडला देखील बसली आहे. कोरोनामुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांचे नाव  अनिल सूरी (Anil Suri) असं आहे. ते ७७ वर्षांचे होते. कोरोना व्हायरसमुळे त्यांचं  निधन झाल्याची माहिती भाऊ राजीव सूरी यांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावाच्या निधनाची बातमी सांगतना  राजीव म्हणाले की, 'प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना सर्वात प्रथम लिलावती रुग्णालय त्यानंतर हिंदुजा रुग्णालयता घेवून जाण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांनी त्यांना खाट देण्यास नकार दिला.  अखेर त्यांना  एडव्हांस मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांना व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते.' परंतु अथक प्रयत्नांनंतर शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


अनिल सूरी यांनी 'कर्मयोगी' चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटाने त्याकाळी उत्तम कामगिरी केली होती. ज्यामध्ये राज कपूर, जितेंद्र आणि रेखा या दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांच्या 'राज तिलक' या चित्रपटाने देखील चाहत्यांचे मन जिंकले. या चित्रपटामध्ये सुनील दत्त, राज कुमार, हेमा मालिनी, धर्मेद्र, रीना रॉय, सारिका आणि कमल हासन यांनी मुख्य भूमिका बजावली होती.