मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण रिया आणि शौविकच्या जामीन अर्जावर आता २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जामीनावरच्या सुनावणीसाठी पुढची तारीख देऊन कोर्टानं कामकाज संपवलं. मुंबई हायकोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जांची सुनावणी इतर आरोपींच्या अर्जांसोबत २९ सप्टेंबरलाच ठेवली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस चक्रवर्ती भावंडांना तुरुंगात राहवे लागणार आहे.
 
बुधवारी म्हणजेच २३ सप्टेंबरला रिया आणि शौविकच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार होती. मात्र मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे कोर्टाने सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. परंतु काही कारणामुळे सुनावणी आजही होवू शकलेली नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे रिया आणि शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जांची सुनावणी इतर आरोपींच्या अर्जांसोबत २९ सप्टेंबरलाच ठेवली आहे. एनसीबीने ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केली होती.  त्यानंतर  एनडीपीसी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 


जामिनासाठी रिया आणि शौविकने कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून  त्यांची ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. परिणामी त्यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली.