मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या निधनानंतर  रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सोशल मीडियावरून गायब झाली होती. मात्र काही काळ गेल्यानंतर गोष्टी सुरळीत होत असल्याच दिसत आहे. सुशांत (Sushant Singh  Rajput)च्या निधनानंतर रियावर लावलेला एकही आरोप सिद्ध झाला नाही. यानंतर रिया पुन्हा एकदा आपल्या खासगी आयुष्यात रुळताना दिसत आहे. रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा ऍक्टिव झाली आहे. 


रिया आता जे काही करतेय त्यावर विश्वास बसणार नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत राहते.  रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्रावर स्टोरीवर हनुमान चालीसा वाचताना तिचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये रियाने हनुमान चालीसाचा फोटो शेअर केला आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती ती वाचताना दिसत आहे. एवढेच नाही तर रिया चक्रवर्तीने अलीकडेच दुर्गा मातेचा फोटो शेअर केला आहे.



अशा पद्धतीने केली करिअरची सुरूवात


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर रिया चक्रवर्तीने तिच्या आतापर्यंत करिअरमध्ये एकूण 8 चित्रपट केले आहेत. 2012 मध्ये त्यांनी Tuneega Tuneega या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या तेलगू चित्रपटानंतर, ती 2013 मध्ये Mere Dad Ki Maruti मध्ये दिसली. पण रिया चक्रवर्तीला 2018 मध्ये 'चेहरे' या चित्रपटातून ओळख मिळाली.




सुशांत सिंह राजपूतसोबत होती रिलेशनशिपमध्ये 


रिया चक्रवर्ती अखेर 'चेहरे' या चित्रपटात दिसली होती. तिने या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. पण रिया चक्रवर्ती वादात अडकल्यानंतर हा चित्रपट रिलीज झालेला पहिला चित्रपट होता. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंह राजपूतसोबतच्या नात्याबद्दल खूप ट्रोल केले गेले. 'चेहरे' नंतर कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा झालेली नाही.