मुंबई : स्वाईन फ्लूने मुंबईला विळखा घातल्याचं दिसत आहे. एकामागे एक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्यानंतर आता आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्रीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. अभिनेत्री रिचा चड्‌ढाही स्वाईन फ्लू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रिचा चड्ढा आजारी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत असे वृत्त आज तक ने प्रसिद्ध केलं आहे.


रिचा पूर्णपणे बरी होईपर्यंत कामाच्या व्यापासून दूरच राहणार असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा हिने फुकरे, गँग्ज ऑफ वासेपुर आणि मसान या सारख्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.


अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे सध्या घरी असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत. आजारी असल्यामुळे ते पुण्यातील पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नव्हते.


तर, मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्याही पत्नीला काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं होतं.