`गुड्डू पंडीत`च्या मुलीचं नाव काय? नावासह जाणून घ्या अर्थ
`गुड्डू पंडीत` या भूमिकेने अली फजलला एक वेगळी ओळख निर्माण केली. हा अभिनेता बाबा झाला असून त्याने लेकीचं नाव जाहीर केलं आहे.
ऋचा चड्ढा आणि अली फजलने 16 जुलै 2024 रोजी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचं आज 7 नोव्हेंबर रोजी नाव जाहीर केलं आहे. 16 जुलै महिन्यात बाळाचा जन्म झाल्यानंतर 20 जुलै रोजी या दोघांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ऋचाने फेब्रुवारी महिन्यात आपण गर्भवती असल्याची माहिती दिली. यांनी वोग इंडियासोबत कोलॅबरेशनमध्ये लेकीचं नाव जाहीर केलं आहे.
लेकीच्या नावाचा खुलासा
ऋचा चड्ढा आणि अली फजलने सोशल मीडियावर एक खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. 'झुनैरा इदा फजल' असं नाव ठेवण्यात आललं आहे. ऋचा चड्ढा आणि अली फजलने लेकीसोबतचे चार फोटो आणि एक पोस्ट शेअर केली आहे.
अली फजलने सांगितलं की,'एक बाळ झाल्यावर तो रिकामेपणा भरून जातो. ज्याबद्दल तुम्हाला कळतही नाही. जीवनातील बदल हा कायम थक्क करणारा असतो. आता काम करणं कठीण झालं आहे. मी घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा मला खूप चिंता वाटते कारण मला प्रत्येक क्षण झुनैरासोबत घालवायचा आहे. मला कायम ऋचा आणि झुनैरच्या जवळपासच राहायचं आहे.'
नावाचा खास अर्थ
अली फजल आणि ऋचा चड्ढाने लेकीला दिलेल्या नावात खास अर्थ दडला आहे. 'झुनैर' म्हणजे परमेश्वराचं फुल असा होता. हा एक अरबी शब्द आहे. 'गायडिंग लाइट' असा देखील याचा अर्थ आहे. चाहत्यांनी केलं कौतुक अली आणि ऋचाने नाव जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी खूप कौतुक केलं आहे. अतिशय वेगळं असं नाव ठेवल्याचं युझर्सनी म्हटलं आहे. या नावाचा खूप खोलवर अर्थ असल्याचं एका दुसऱ्या युझरने म्हटलं आहे.
कुणी सुचवलं हे नाव
जावेद अख्तर यांनी अली आणि ऋचाला हे नाव सुचवलं आहे. ज्वाला फजल हे नाव सांगितलं पण पालकांना झुनैरा हेच नाव जास्त आवडतं. आजपासून या दोघांची मुलगी झुनैरा नावाने ओळखली जाईल. या दोघांनी तिच्या नावासोबतच तिचा पहिला फोटो देखील पोस्ट केला आहे. पण या फोटोत झुनैरचा चेहरा दिसत नाही.