मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध सिटकॉमने गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा केला आहे. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळते. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही तारक मेहता मालिकेतील 'बबिता जी'च्या मागे वेडे झाले आहेत. मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने काही फोटो शेअर करून लोकांना थक्क केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता मुनमुनचे हे सुंदर फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अभिनेत्रीने जरी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली तरी ती काही तासांतच व्हायरल होते.  आम्ही तुम्हाला सांगतो की मुनमुन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया साइट्सवर देखील खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट करत असते.


काही वेळापूर्वी, तारक मेहताच्या टप्पू आणि बबिता जीच्या अफेअरच्या बातम्यांनी संपूर्ण सोशल मीडिया वेडं झालं होतं. या दोघांच्या अफेरर्सच्या चर्चांनाही वेग आला होता. राज आणि मुनमुनच्या वयात ९ वर्षांचा फरक आहे. अशा परिस्थितीत सेटवरील त्यांची वाढती जवळीक आणि अफेअरच्या अफवांनी चांगलाच पेट घेतला होता. प्रत्येकजण त्यांच्या अफेअरबद्दल बोलत होता.


या दोन्ही कलाकारांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दोन्ही कलाकारांचे अनेक मीम्सही व्हायरल झाले. यानंतर राज आणि मुनमुनला समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. मुनमुन दत्ताने भावनिक पोस्ट लिहून प्रत्येक बातमी खोटी असल्याचंही यावेळी सांगितलं होतं.


अलीकडेच, राजने दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं की,  काही लोक आहेत जे याबद्दल बोलत आहेत. पण मी नेहमी माझ्या कामाला महत्व देतो. गॉसिप हा अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग असतो. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मी गॉसिपींग टाळण्याचा प्रयत्न करतो. मी अशा अफवांर लक्ष देत नाही. मला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही'' याचबरोबर त्याने पुढे आपण लवकरच एका नव्या शोमध्येही दिसणार असल्याचं सांगितलं आहे.