व्हिडिओ : `या` नव्या सिनेमातून आर्ची प्रेक्षकांच्या भेटीला!
सैराट या ब्लॉकबस्टर सिनेमातून आपल्या मनामनात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : सैराट या ब्लॉकबस्टर सिनेमातून आपल्या मनामनात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना जबरदस्त उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील गाण्याचा मेकींग व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून रिंकूचा डान्स आणि अदा पाहायला मिळतील.
हा आहे नवा सिनेमा
कागर या नव्याकोऱ्या सिनेमातून रिंकू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंदा माने यांनी 'कागर' सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. पण या सिनेमात रिंकूचा नायक कोण, याबद्दल गुप्तता बाळगण्यात आली आहे.
या व्हिडिओत रिंकू आनंदाने डान्स करत आहे. पाहा तिची धमाल या व्हिडिओतून...