`या` मराठी चित्रपटातून रिंकू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !
सैराटमधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर सिनेरसिकांच्या मनावर गारुढ केले.
मुंबई : सैराटमधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर सिनेरसिकांच्या मनावर गारुढ केले. तिची भाषाशैली, शब्दफेक, स्क्रीनवरील तिचा वावर, डोळयातील चमक या सगळ्यामुळे तिने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या कौतुकाला राष्ट्रीय पुरस्काराची जोड मिळाली.
मराठीतील सगळे रेकॉर्डस मोडणाऱ्या सैराटने बॉक्स ऑफिसवर झिंगाट यश मिळवले. मराठीनंतर तिने सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये ही काम केले. मात्र मराठीत आर्चीला पुन्हा बघता आले नाही.
मात्र त्यासाठी आता अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. लवकरच रिंकू एका मराठीत चित्रपटात झळकणार आहे. सध्या चित्रपटाचे वाचन सुरु असून त्याबद्दल इतर माहितीबाबत गुप्तता राखण्यात आली आहे. परंतु, लवकरच चित्रपटाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय. आर्ची आणि परश्या ची केमिस्ट्री सगळ्यांचा भावली. त्यामुळे आता रिंकूच्या आगामी चित्रपटात तिच्यासोबत कोण झळकणार ही उत्सुकता प्रेक्षकांना आहे.