दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (kantara) या चित्रपटाचं नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. कन्नडमध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी तो इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदीतील (Hindi) 'कांतारा' (kantara) हा चित्रपट 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला. आयुष्मान खुरानाचा 'डॉक्टर जी' चित्रपटासोबत कांतारा रिलीज झाला आहे. याशिवाय 'विक्रम वेधा' आणि 'पोनियिन सेल्वन' हे सिनेमे देखील थिएटरमध्ये आधीपासून होते. मात्र छोट्या बजेटचा 'कांतारा' (kantara) पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलीच गर्दी करत आहेत. (Rishab Shetty kantara hindi dubb movie 7 days collection)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्याभरानंतरही हा चित्रपट थिएटरमध्ये मजबूत स्थितीत आहे. दिवाळीच्या सुट्टीचाही या चित्रपटाला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'कांतारा'च्या कमाईबद्दल ट्विट करुन माहिती दिलीय. ' हा चित्रपट एकटाच प्रदर्शित झाला नाही तसेच त्याचे  प्रमोशनही कमी झाले. फक्त तोंडी प्रसिद्धी करण्यात आली. तरीही आठवड्याभरातच दिवसात चित्रपटाची कमाई आश्चर्यकारक आहे.


'कांतारा'ने हिंदीत चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 1.27 कोटी, शनिवारी 2.75 कोटी, रविवारी 3.5 कोटी, सोमवारी 1.75 कोटी, मंगळवारी 1.88 कोटी, बुधवारी 1.95 कोटी आणि गुरुवारी 1.90 कोटींचा गल्ला जमवला. अशा प्रकारे 7 दिवसात 15 कोटी जमा झाले आहेत.



 
दरम्यान, 'कांतारा'ने जगभरातील कमाईमध्ये 170 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 'केजीए' चित्रपटाच्या निर्मात्याने कांतारा या चित्रपटाची निर्मिती केलीय. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आहेत. या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे