मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आज 65 वर्षांचे झाले. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची बॉलिवूडमधील एक लोकप्रिय हिट जोडी मानली जाते. आज ऋषी कपूर यांच्या वाढदिवसादिवशी पाहूया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा पहिला सिनेमा 'जहरीला इन्सान' केला. मात्र तो अगदीच वाईट पद्धतीने फ्लॉप झाला. अगदी 14 वर्षांची नीतू असताना तिने ऋषी कपूरला डेट करण्यास सुरूवात केली. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतूला सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला अतिशय इरिटेट करत असेल. मात्र हळू हळू हाच राग प्रेमात रुपांतर झाला. 'खेल खेल' सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली. ऋषी कपूरने करिअरची सुरूवात 'बॉबी' या सिनेमापासून केली. राज कपूरने आपला मुलगा ऋषी कपूरला लाँच करण्यासाठी सिनेमा तयार केली. नीतू सिंहला असं वाटत होतं की तिला "बॉबी' या सिनेमात लीड रोलमध्ये घ्यावं पण ही बाजी डिंपल कपाडीयाने मारली. 


'बॉबी' या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी ऋषी कपूरला डिंपल कपाडियासोबत प्रेम झालं. ऋषी कपूर डिंपल कपाडियाला प्रोपोझ देखील करणार होते. पण राज कपूर यांनी ऋषी कपूरला हे करण्यापासून रोखलं. त्यावेळी ऋषी कपूर आपल्या वडिलांच्या विरोधात जाणार नव्हते. म्हणून ते डिंपलला विसरून गेले.. याचवेळी इंडस्ट्रीत अशी चर्चा रंगली की, नीतू आणि ऋषी कपूर लग्न करत आहेत. नीतूने अनेक सिनेमे ऋषी कपूर सोबत साइन केलेत. दोघांच्या प्रेमाची माहिती कपूर कुटुंबियांना देखील होती. तेव्हा राज कपूर यांनी ऋषी कपूर यांना स्पष्ट सांगितलं की, जर तुम्ही प्रेम करता तर तुम्ही लग्न करा. आणि 1979 मध्ये ऋषी आणि नीतूने लग्न केलं.