Rishi Kapoor : टी रामा राव यांच्या 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नसीब अपना अपना' या चित्रपटाची आजही प्रेक्षकांना क्रेझ आहे. या चित्रपटात ऋषी कपरू महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्यासोबत वेगळ्याच प्रकारची वेणी घालून असलेली चंदो सगळ्यांना आठवत असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की त्याच चंदोशी ऋषी कपूर यांचं लग्न लावून देण्यात आलं. तिला ऋषी कपूर हे मुंबईला घेऊन येतात आणि ती पतीच्या घरी दिवस-रात्र मोलकरणीसारखं काम करते. ती भूमिका कोणत्या अभिनेत्रीनं साकारली आणि आता काय करते हे तुम्हाला माहित आहे का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाची पटकथा लोकांना लक्षात राहो नाही तर नको पण चंदोची वेणी ही सगळ्यांच्या लक्षात आहे. चंदो तिच्या या हटके भूमिकेसाठी ओळखली जाते. तर त्या अभिनेत्रीच नाव राधिका सरथकुमार आहे. ऋषी कपूर, राधिका यांच्या शिवाय या चित्रपटात फराह नाज महत्त्वाच्या भूमिकेत होते. राधिका यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या तमिळ अभिनेता, नेता एमआर राधा यांची मुलगी आहे. राधिका यांनी चित्रपटसृष्टीत स्वत: चं स्थान मिळवल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राधिका आता भाजपाकडून निवडणूक लढत आहे. इतक्या वर्षात त्यांचा चेहरा फार बदलला आहे. 


दोन्ही लग्न मोडली


राधिका यांनी 1985 मध्ये मल्याळम अभिनेता आणि निर्माता प्रताप पोथेनशी लग्न केलं. तर एक वर्षात ते विभक्त झाले. त्यानंतर ते दोघं विभक्त झाले. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर राधिका यांनी दुसऱ्या लग्न केलं ते ब्रिटिश नागरिक रिचर्ड हार्डी यांच्याशी. त्यांचं लग्न 1990 मध्ये झालं आणि पुढच्या दोन वर्षात ते देखील विभक्त झाले. 


तिसरं लग्न


त्यानंतर 2001 मध्ये राधिका यांनी माजी बॉडीबिल्डर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आणि राजकारणी असलेल्या सरथकुमार रंगनाथनसोबत लग्न केलं. दोघांनी दोन तमिळ चित्रपट नम्मा अन्नाची आणि सूर्यवंशम सारख्या चित्रपटामध्ये काम केलं. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव राहुल आहे आणि एक मुलगी असून तिचं नाव रेयान असं आहे. रेयानचं लग्न क्रिकेटपटू अभिमन्यु माथुरशी झालं. अभिमन्यू विषयी बोलायचे झाले तर तो विराट कोहलीच्या आयपीएल टीम-रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुकडून खेळतो. 


चेक बाउंस प्रकरणात अडकल्या


राधिका या चेक बाउंस प्रकरणात अडकल्या होत्या. 2014 मध्ये त्यांची कंपनी मॅजिक फ्रेम्सनं रेडियंस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून खूप मोठ कर्ज घेतलं होतं. त्यानंतर त्यांचे पती सरथकुमार यांनी एक अग्रीमेंट घेत 50 लाखाचे आणखी कर्ज घेतले. या बदल्यात त्यांनी काही ठरावीक रक्कमेचा चेक दिला होता. पण 2017 मध्ये देण्यात आलेले चेक बाउस झाले होते. 


हेही वाचा : सलमानच्या चित्रकलेपुढं सगळं फिकं! आमिर खानची 'गजनी' Painting पाहिली का?


त्यांनी वचन दिले होते की मार्च 2015 पर्यंत सगळे पैसे परत देतील, मात्र रेडियंस मीडियानं आरोप केला की मॅजिक फ्रेम्सनं सात चेक जारी केले होते आणि सगळे चेक हे बाउंस झाले. ज्यामुळे त्यांच्याविरोधात सात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तर 2021 मध्ये विशेष कोर्टानं या प्रकरणात राधिका आणि सरथकुमार यांना दोषी घोषित केले. कोर्टानं त्या दोघांना एक वर्षाचा तुरुंगवास आणइ 3.3 कोटींचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात त्यांच्या पतीला सुटका मिळाली आणि राधिका विरोधात वॉरंट जारी केलं होतं. कारण त्यावेळी त्या तिथे उपस्थित राहिल्या नाही.