माझ्याबद्दल `हे` ऐकून ऋषी कपूर यांना बसला होता धक्का... वाचा, काय म्हणाली तापसी
तापसी पन्नूने 2013 मध्ये `चश्मे बद्दूर` या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
मुंबईः 'शाब्बास मिथू' हा तापसीचा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तापसीला हिंदी इंडस्ट्रीमध्ये येऊन नऊ वर्षे झाली आहेत. प्रत्येक चित्रपटात तिने वेगळी अशी छाप पाडली आहे. त्यामुळे तापसीचा एक असा चाहतावर्ग तयार झाला आहे. तापसी पन्नूने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पण बॉलीवूडमध्ये येणाऱ्यापुर्वी तापसीने साऊथच्या इंडस्ट्रीत डझनभर रिलीज यशस्वीपणे केल्या आहेत. त्यातून तिचे करिअरही सध्या चांगलेच पिकवर आहे.
तापसीने २०१० मध्ये तेलुगू चित्रपट 'झुम्मंडी नादम'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने प्रभाससोबत 'मिस्टर परफेक्ट' हा सिनेमा केला त्यानंतर तिने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपट केले. जेव्हा 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर'मधून तापसीने बॉलीवूड डेब्यू केले तेव्हा तिने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते पण तेव्हा पाहिल्यांदाच काम करताना तापसीने ऋषी कपूर यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
'शाब्बास मिथू'च्या प्रमोशनच्या वेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीतून तिने असे सांगितले की, “नऊ वर्षांपूर्वी जेव्हा मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा 'चश्मे बदूर' रिलीज झाला तेव्हा मला सांगण्यात आले की तूझी जी इमेज आहे ती तूला पुसून टाकावी लागले कारण तू साऊथमधून आली आहेस. कारण इथे तूला सगळे साऊथ इंडियन एकट्रेस म्हणूनच ओळखतील तेव्हा मी उलट त्यांना सांगितले की यार... मी इतकी मेहनत करून आली आहे इथे त्याची काहीच किंमत नाही का...मीही चांगल्या लोकांसोबत काम केले आहे..''.
जेव्हा 'चश्मे बद्दूर' सिनेमा तापसीने केला तेव्हा ऋषी कपूर यांनी तिला तू साऊथमध्ये किती चित्रपट केलेस? असे विचारले होते तेव्हा तापसीने दिलेले उत्तर ऐकून ऋषी कपूर यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. ती म्हणाली, “मला आठवतं की 'चष्मे बदूर'च्या सेटवर ऋषी कपूर सरांनी मला एकदा विचारलं होतं, ‘मग तू साऊथमध्ये किती चित्रपट केले आहेत?’ मी म्हटलं 10 आणि मी 11 व्या चित्रपटात काम करत आहे. 'चष्मे बदूर' रिलीज होईपर्यंत माझ्याकडे साऊथचे 12 चित्रपट तयार असतील, तेव्हा हे ऐकून ऋषी कपूर मला म्हणाले, ''अरे, तू तो बहोत एक्सपिरियन्स्ड हैं...''
15 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या शाबाश मिथू या बायोपिकमध्ये क्रिकेटर तापसी मिताली राजच्या भूमिकेत दिसत आहे.