अभिनेता ऋषी सक्सेना दिसणार हिंदी चित्रपटात; `या` दिवशी होणार सिनेमा रिलीज
ऋषी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे.
मुंबई : 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत ऋषी सक्सेना या कलाकारांच पदार्पण झालं तेव्हापासून आजपर्यंत तो अनेक अनोख्या भूमिका साकारताना दिसला. अगदी टीव्ही पासून ते चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वेगवेगळ्या म्युजिक अल्बम मध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. ऋषी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे आणि याच निमित्त देखील तितकच खास आहे. " मल्हार " या हिंदी चित्रपटात तो अनेक हिंदी कलाकारांच्या सोबतीने मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ऋषी अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन कायम जिंकल आहे.
हिंदीत चर्चेत असलेल्या शारिब हाश्मी, अंजली पाटील आणि कलाकारांच्या सोबतीने तो " मल्हार " या हिंदी चित्रपटात झळकणार असून येत्या 31 मे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्री आणि त्याची अनोखी गोष्ट मल्हार मधून उलगडणार असून पुन्हा एकदा ऋषी ला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ऋषी ने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट मालिका मध्ये काम केलं आहे आणि स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे आता पुन्हा ऋषी काय वेगळी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.
काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. . २०१६साली प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शिव व गौरी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेता ऋषी सक्सेना व मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते.'काहे दिया परदेस' मालिकेत शिव हे पात्र साकारुन ऋषी सक्सेना घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली.
मालिकांबरोबरच ऋषीने सिनेमात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त', 'रेनबो' या चित्रपटांतून ऋषी मोठ्या पडद्यावर झळकला. दरम्यान, ऋषी सक्सेना व अभिनेत्री ईशा केसकर रिलेशनशिपमध्ये आहेत. ऋषी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर ऋषीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.