Riteish Deshmukh Ganpati : गणेशोत्सवाचं सगळेच आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. अशात काल गणरायाचं आगामन झालेलं आहे. सगळेच आपल्या घरातील गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या घरातील गणपतीची प्रतिक्षा करत होते. आता निसर्गाचा विचार करत सगळेच इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्या घरी आणण्याचा विचार करत आहेत. अशात आता अनेक सेलिब्रिटी स्वत: मातीचा गणपती बनवत आहेत. तर काही सेलिब्रिटी हे काही तरी वेगळं करण्याचा प्लॅन करत आहेत. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. रितेशनं इको फ्रॅंडली किंवा रिसायकल्ड वस्तूंपासून गणपती बनवला आहे. तर देशमुखांच्या घरी आलेल्या गणपतीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशच्या घरी दरवर्षी गणपतीसाठी विविध प्रकारची सजावट केली जाते. यंदा देशमुख कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रियान आणि राहिल हे गणेशाची आरती गाताना दिसत आहेत. तर त्यांनी गायलेली आरती ही बॅकग्राऊंडला सुरु असताना व्हिडीओत रियान, राहिल आणि रितेश गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी ते सगळे गणपतीची आरती करताना दिसत आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करत रितेशनं कॅप्शन दिलं आहे की 'गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतो. रियान आणि राहिलच्या आग्रहामुळे यंदा रिसायकल थीमने मूर्ती घडवली.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : '100 कोटींच्या प्रोजेक्ट नकारताच आरशासमोर स्वत:ला लगावली कानशिलात '; गोविंदाचं नक्की काय सुरुये?


रितेशनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी कमेंट करत स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांचे संस्कार हे त्यांच्या वयापेक्षा खूप जास्त आहेत. गणपती बाप्पा मोरया.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बाळा छान खूप मोठा हो तुझ्या आजोबांसारखा पापा आणि काकांसारखा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मस्त गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मुलांवर खूप चांगले संस्कार आहेत.'