Riteish Deshmukh : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लाडकं कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्याकडे पाहिलं जातं. रितेश आणि जिनिलिया हे दोघे इन्स्टाग्रामवर मजेशीर रिल्स बनवून आपल्या चाहत्यांना हसवत असतात. तसेच अनेकदा त्यांचे स्टायलिश अंदाजातले फोटो सुद्धा शेअर करतात.  नुकतेच रितेश आणि जिनिलिया हे त्यांच्या मुलांसोबत परदेशात फिरायला गेले होते. त्यावेळी दोघांनी आपले सुंदर फोटो शेअर केले ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला. पण अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या रिलमध्ये दिसणाऱ्या वैवाहिक आयुष्या मागचं सत्य सांगितलं आहे. 


पाहा व्हिडिओ : 



सध्या रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात रितेश आणि जिनिलिया एका समुद्र किनारी बसले आहेत. यात रितेश म्हणतो, 'मी आणि जिनिलिया एका सुट्टी एन्जॉय करण्यासाठी फिरायला आलोय. इथे समुद्र आहे रेती आणि सुंदर निसर्ग आहे. पण फक्त एवढंच नाही तर सोबत लहान मुलं देखील आहेत. लहान मुलं तिथे खेळतायंत आणि आम्ही इथं काय सांभाळतोय तर त्यांची बूट, कपडे, बॅग...'  यावर पुढे रितेश मजेत म्हणतो की, 'आता हीच काम राहिलीयेत. जस दिसतं तस नसतं. इन्स्टाग्रामवर जाऊ नका त्यामागची खरी परिस्थिती सांगतो आज..' रितेश आणि जिनिलियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने म्हंटले की, 'आम्हाला वाटलं की हा फक्त आमचाच प्रॉब्लेम आहे पण हे सर्वांसोबत होत'. 


अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया या दोघांचं लग्न 2012 मध्ये झालं असून त्यापूर्वी दोघे एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. जिनिलियाने 2014 मध्ये त्यान्हा मोठा मुलगा रियान याला जन्म दिला. तर २०१६ मध्ये रितेश जिनिलियाने त्यांचा धाकटा मुलगा राहील याला जन्म दिला. रितेश आणि जिनिलिया त्यांच्या कुटूंबातील अनेक गॉड क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.