`भावनांशी खेळू नको`, भारत की इंडिया? सोशल मीडियावर प्रश्न विचारणारा रितेश देशमुख ट्रोल
Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर देशाच्या नावावरून पोल केला आहे. त्यावरून काहींनी त्याला ट्रोल केले आहे. तर काहींनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या या पोलचं कौतुक देखील केलं आहे.
Riteish Deshmukh : संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे 'इंडिया' आणि 'भारत' या नावावरून... नक्की आपल्या देशाचं नाव भारत आणि की इंडिया या गोंधळानं नागरिकांमध्ये वेगळाच वाद सुरु झाला आहे. कारण जेव्हा इंग्रजीत आपल्या देशाचं नाव घेण्यात येतं तेव्हा इंडिया असा उल्लेख करण्यात येतो. हे नाव कसं आलं आणि खरंच आपण देशाचं नाव बदलायला हवं का? अशी चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. त्यावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणी भारत नावाला पाठिंबा दिला आहे तर कोणी इंडिया... तर कोणी दोन्ही नावं असली तरी काय फरक पडतोय... आपण बदलणार नाही आहोत ना असं म्हटलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं केलेली पोस्ट चर्चेत आहे. रितेशनं त्याची प्रतिक्रिया न देता त्यानं थेट नेटकऱ्यांची प्रतिक्रिया विचारली आहे.
रितेशनं त्याच्या एक्स अकाऊंट म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंटवरून हा पोल घेतला आहे. या पोलमध्ये त्यानं चार ऑप्शन ठेवले आहेत. भारत, इंडिया, हिंदुस्तान आणि सगळी नावं एकच आहेत. तर पहिला ऑप्शन म्हणजे भारतला 28.6 टक्के लोकांनी मत दिलं. इंडिया या ऑप्शनला 24 टक्के लोकांनी मत दिलं. तिसरा ऑप्शन हिंदुस्तानला 4.1 टक्के लोकांनी मत दिलं. चौथा ऑप्शन म्हणजे सगळ्याचा अर्थ एकच आहे याला 43.4 टक्के लोकांनी मत दिलं.
हेही वाचा : अभिनेत्रीच्या आईवर आली भीक मागण्याची वेळ; Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
रितेशनं केलेल्या या पोलवर फक्त नेटकऱ्यांनी त्यांचं मत दिलेले नाही. तर त्यासोबतच त्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'सगळ्याचा अर्थ एकच आहे. आम्हाला वेगळं होण्याची गरज नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळ्या भावना आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'इंडिया, भारत आणि हिंदुस्तान सगळं एकच आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'इंडिया आणि भारत एकच आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सगळ्याचा अर्थ एकच आहे. काही कारण नसताना इंडिया की भारत या नावावरून वाद सुरु झाला आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जर तुम्ही चंद्राला मून असं बोलू शकतात. तर समुद्राच्या लाटा देखील तशाच राहणार आहेत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'या गोष्टीवर आधी पत्नीसोबत रील तयार कर, जेणेकरून अनेकांचे लक्ष वेधले जाईल, पण कोणाच्या भावनांशी खेळू नका'.