आयुष्यातली सर्वात मोठी चूक! `ती` एक आठवण Riteish Deshmukh ला आजही भूतकाळात नेते
Riteish Deshmukh हा एक अभिनेता असण्यापेक्षा अनेकांचाच जिगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मित्रांसोबत धमाल करणारा रितेश चाहत्यांशी असणारं खास नातंही तितक्याच प्राधान्यानं जपताना दिसतो.
Riteish Deshmukh : मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कलाजगतांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवणारं एक नाव म्हणजे अभिनेता रितेश देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुख यांचा मुलगा, रितेश राजकारणापेक्षा कलाजगतातच फार रमला आणि इथं त्यानं स्वत:ची वेगळी ओळखही तयार केली. रितेशकडे आज हिंदी आणि मराठी कलाजगताला जोडणारा दुवा म्हणूनही पाहिलं जातं. अशा या अभिनेत्यानं नुकतंच त्याच्या जीवनातील एक मोठी गोष्ट सर्वांपुढे आणली आहे.
चाहत्यांशी खास नातं जपणाऱ्या रिशेनं एका कार्यक्रमादरम्यान आपली आजपर्यंतची सर्वात मोठी चूक कबुल केली, तो थेट भूतकाळात पोहोचला आणि हे सर्व सुरु असताना त्याची पत्नी, जिनिलीयासुद्धा तिथं हजर होती. (riteish deshmukh talks about biggest mistake in life on kareena kapoor show Bollywood news )
आता तुम्ही म्हणाल छे! रितेश कशी काय चूक करेल? पण, त्यानं एक गोंधळात टाकणारा निर्णय घेतला आणि त्यावर पश्चाताप झाल्याचं वक्यव्य करून तो मोकळाही झाला. अभिनेत्री करीना कपूर खानच्या एका टॉक शोमध्ये नुकतीच रितेश आणि त्याच्या पत्नीनं हजेरी लावली होती. इथं या कलाकार मित्रांच्या गप्पांचा फड रंगला आणि पाहता पाहता अनेक गुपितं समोर येऊ लागली. अनेक चर्चांची पडताळणीही होऊ लागली.
रितेशची ती एक चूक...
गप्पांच्या ओघाओघात रितेश असं काही म्हणाला की चाहत्यांना धक्काच बसत आहे. इतकंच काय, तर हे सर्व ऐकताना तिथं असणाऱ्या करीनाचीही अशीच काहीशी अवस्था झाली होती. तर, जिनिलीयाला हसू आवरत नव्हतं.
हेसुद्धा पाहा : खासदार धनंजय महाडिक यांच्या सुनेनं वळवल्या नजरा; पाहिले का 'वहिनीसाहेबांचे' Photos?
रितेशनं आतापर्यंत Humshakals आणि Apna Sapna Money Money या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारलं आहे. या भूमिकेच्या वेळी त्याला महिलांप्रमाणंच सौंदर्याच्या बाबतीत काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या सहसा महिला करतात. थोडक्यात रितेशनं भूमिकेसाठी full body waxing केलं. बरं इतक्यावरच न थांबता त्यानं eyebrows करण्याचाही निर्णय घेतला आणि इथं तो फसला. कारण, त्यानंतर बरेच दिवस त्याच्या चेहऱ्यावरून भुवया दिसेनाशाच झाल्या होत्या. ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती, असं अखेर त्यानं करीना आणि जिनिलीयासमोर कबुल केलं.
भूमिकेच्या निमित्तानं एक स्त्री म्हणून वावरत असताना रितेशनं महिलांना सामोरं जावं लागणाऱ्या अडचणी जाणल्या. ज्यानंतर त्यानं महिला कलाकारंसह समस्त महिला वर्गाचा आपण प्रचंड आदर करत असल्याचंही तो म्हणाला.