...म्हणून Riteish Deshmukh ला जंटलमेन म्हणतात! विमानतळावर छोट्या चाहत्याबरोबरच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं...
Riteish Deshmukh चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अचानक विमानतळावर भेटलेल्या त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत रितेश देशमुखनं जे केलं त्यानं सर्वत्र त्याची स्तुती करण्यात येत आहे. त्याला जेन्टलमन का बोलतात त्याचं हे उदाहरण आहे.
Riteish Deshmukh : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. काही दिवसांपूर्वी रितेशचा वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. त्यांच्या या चित्रपटातील 'वेड लावलय' हे गाणं चांगलचं गाजलं होतं. या गाण्यावर आजही लोक डान्स करताना दिसतात. दरम्यान, त्यावर रितेश डान्स करत असल्याचे आपण बऱ्याचवेळा पाहतो. रितेशचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रितेश त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
रितेशचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जिनिलिया दिसत आहेत. हे दोघं विमानतळावर असल्याचे आपण यात पाहू शकतो. रितेशनं नियॉन रंगाचं स्वेटशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. तर जिनिलियानं पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एक छोटा चाहता दिसत आहे. त्या चाहत्यानं रितेशसोबत 'वेड लावलय' या गाण्यावर डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि रितेशनं त्याला होकार देत त्याच्यासोबत या गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा व्हिजीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश त्या मुलाची गाणं लावण्यासाठी शांतपणे प्रतिक्षा करताना दिसतो. हे पाहता नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे.
हेही वाचा : 'आयुष्याचा प्रवास ट्रेनसारखा, उतरायचं स्टेशन चुकलं तर...', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
रितेशच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ज्या प्रकारे तो शांतपणे त्या मुलाची प्रतिक्षा करतोय, ते खूप चांगलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप चांगली व्यक्ती आणि प्युर सोल आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे दोघं पती पत्नी किती चांगले आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा तितकीच चांगली आहेत.' तर एका नेटकऱ्यानं त्याला आलेला रितेशसोबतचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, 'माझी पत्नी माझ्या मुलाला घेऊन मुंबईतील एका खूप लोकप्रिय रुग्णालयात गेली होती. त्याच्या समोरच एक कॉफी शॉप होतं आणि तिथे रितेश देशमुख कॉफी पित होता. त्यानंतर तो माझ्या मुलासोबत जवळपास दहा मिनिटं खेळत होता. तो खूप चांगला माणूस आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रितेश किती चांगला आहे.'