Ritesh Deshmukh and Genelia's Funny Video : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. रितेश आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे रील्स हे सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. खरंतर त्यांचे रील्स हे एकतर मजेशीर असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काही तासात व्हायरल देखील होतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या रील व्हिडीओत रितेश जिनलियाला निवडणूकीविषयी विचारताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशनं पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि ग्रे रंगाचं ब्लेझर परिधान केलं आहे. तर जिनिलियानं नाईट सूट परिधान केला आहे. यावेळी रितेश जिनिलियाला विचारतो की 'तुला काय वाटतं, यावेळी निवडणूक कोण जिंकेल?' तेव्हा जिनिलिया उत्तर देत बोलते की, 'अरे, कोणीही जिंकू दे... तुझ्यावर तर माझंच राज्य असेल'. त्यानंतर रितेशनं दिलेल्या हावभावांनी प्रेक्षकांना हसू अनावर झाले आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत रितेशनं कॅप्शन दिलं की 'अब की बार नाही, हर बार बिवी की सरकार... इलेक्शन 2024'. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रितेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'खरी होम मिनिस्टर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हर बार जिनिलिया सरकार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कसं..वहिनी म्हणतील तसं !' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'घरातील होम मिनिस्टर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अगदी बरोबर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'फिर एक बार जेनेलिया सरकार.' तर आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'तू अगदी तुझ्या वडिलांसारखा दिसतोयस.' इतर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर कमेंट केल्या आहेत. 


हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री


दरम्यान, रितेश आणि जिनिलियाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर रितेशविषयी बोलायचं झालं तर तो 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्याशिवाय तो 'हाऊसफुल्ल 5' मध्ये दिसणार आहे. जिनिलिया ही लवकरच आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.