मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. रितेश इतका जेवतोय की, त्याच्या शर्टचं बटणही तुटायला लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचनाक कसं वाढलं वजन?
खरंतर, रितेश देशमुखचा हा व्हिडिओ त्याच्या आगामी 'मिस्टर मम्मी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक संदेश लिहीला आहे. ज्यामध्ये असं लिहीण्यात आलं आहे की, 'जेव्हा तुमचा दिग्दर्शक तुम्हाला चित्रपटासाठी वजन वाढवायला सांगतो.' यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'ये लो कालरी मील' हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.


एका यूजरनं लिहिलं, 'कितवा महिना आहे? तर दुसर्‍या युजर्सने लिहिलं आहे की, सर, प्रोस्थेटिकचा वापर केला असता. तर एका दुसर्‍या युजरने त्याची खिल्ली उडवत म्हटलं आहे की, 'भाऊ स्वत:ची काय अवस्था करुन घेतलीये'. या सिनेमाची कथा एका  कपलभोवती फिरते ज्यांचे विचार मुलांच्या बाबतीत एकमेकांशी जुळत नाहीत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटात लोकांना कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन पाहायला मिळतील. रितेशचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाही दिसणार आहे. या चित्रपटातून जेनेलिया बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाद अली करत आहेत. याआधी त्यांनी बंटी और बबलीसारखा सुपरहिट चित्रपट केला आहे.