मुंबई : मुंबईsssss तुला बीएमसीवर भरवसा नाही का... असं विचारत मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडणारी सर्वांचीच लाडकी आरजे मलिष्का पु्हा एकदा एका नव्या अंदाजात आली आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आणणारी हीच मलिष्का आता, आमखी एका व्हिडिओच्या माध्यमातून रस्ते व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना करावा लागणाऱ्या ्डचणींचा सामना यावर भाष्य करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मलिष्का, तिच्या नेहमीच्या शैलीत 'मुंबईssss', असं म्हणताना दिसते. मुख्य म्हणजे असं म्हटल्यानंतर पुढे मलिष्का कोणतं नवं गाणं म्हणत या परिस्थितीवर भाष्य करणार याविषयी कुतूहल जागत नाही तोच चक्क चित्रपट गीतं वाजू लागतात. 'देखो चाँद आया', 'तूम आए तो आया मुझे याद गली मे आज चाँद निकला....' या गाण्यांपासून ते अगदी 'चंदा रे चंदा रे', या गाण्यांपर्यंत चंद्राचा उल्लेख असणारी अनेक गाणी या एका व्हिडिओत वाजतात. 


फक्त हिंदीच नव्हे, तर डोंगराचे आरुन इक बाई चांद उगवला असं म्हणत मलिष्का आणि तिची टोळी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपरोधिक टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. अतिशय विनोदी पण तितक्याच प्रत्ययकारी अशा अंदाजात हा व्हिडिओ सादर करण्यात आला आहे. जो माय मलिष्का या अधिकृत फेसबुक पेजवनरुन पोस्ट करण्यात आला आहे.