RK बॅनरबद्दल रणधीर कपूर यांचा मोठा खुलासा
RK फिल्म्स आता बॉलिवूडमध्ये पुन्हा दरमदार एन्ट्री करण्याच्या विचारात आहे.
मुंबई : 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम' असे एकना अनेक चित्रपट RK बॅनरखाली साकारण्यात आले. त्याकाळी हे चित्रपट हिट देखील ठरले. RK फिल्म्स म्हटलं की प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं नाव समोर येतं. आजही बॉलिवूड प्रेमींच्या मनात RK फिल्म्सने घर केलं आहे. दोन वर्षांपूर्वी RK स्टुडिओ विकण्याची बातमी समोर आली होती. तेव्हा समस्त बॉलिवूड प्रेमींना मोठा धक्का बसाला होता. RK पुन्हा कधी पदार्पण करेल अशी आशा देखील अनेक चाहत्यांनी सोडली होती. परंतू RK फिल्म्स आता बॉलिवूडमध्ये पुन्हा दरमदार एन्ट्री करण्याच्या विचारात असल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांरपासून RK फिल्म्स बॉलिवूडमध्ये पुन्हा दरमदार एन्ट्री करण्याच्या चर्चा जोरदार रंगत होत्या, मात्र अनेक वेळा त्या फक्त अफवा ठरल्या. परंतू आता खुद्द राज कपूर यांचे मोठे पुत्र रणधीर कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. RK बॅनरखाली ते नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
ई-टाईम्सला रणधीर कपूर यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'आम्ही चित्रपट साकारण्याच्या विचारात आहोत. RK फिल्म्स आता पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपट प्रेम कथेवर आधारलेला असणार आहे.' मात्र चित्रपटामध्ये कोण भूमिका साकारेल हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान काही वर्षांपूर्वी RK फिल्म्सला भीषण आग लागली होती. त्यामुळे स्टुडिओमधील संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. परिणामी २०१८ मध्ये हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीला विकण्यात आला होता.