Robert Downey Jr : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स स्टार रॉबर्ट डाउनी जूनियरला त्याच्या आगामी ॲव्हेंजर्स चित्रपटासाठी मोठी रक्कम मिळणार आहे. ॲव्हेंजर्स चित्रपटासाठी डाउनी ज्युनियरला मोठी रक्कम तसेच खासगी जेट सुविधा देण्यात येणार आहेत. तर रूसो ब्रदर्सलाही मोठी रक्कम मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉबर्ट डाउनी जूनियर हा अतिशय लोकप्रिय सुपरस्टार आहे. आयर्न मॅन आणि टोनी स्टार्कमधून त्याने बरीच चर्चा निर्माण केली. त्यानंतर आता तो ॲव्हेंजर्सच्या पुढील भागात दिसणार आहे. कारण अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या आधीच्या चित्रपटात आयर्न मॅनचे त्याचे पात्र मारले गेले होते. त्यामुळे चाहते त्यांच्या आवडत्या आयर्न मॅनच्या पुनरागमनाची वाट आतुरतेने पाहत आहेत.


रुसो ब्रदर्सना मिळणार मोठी रक्कम


ॲव्हेंजर्सच्या दिग्दर्शकांना, रुसो ब्रदर्सनाही मोठा पगार मिळणार आहे.  कारण मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सची इच्छा आहे की त्यांनीच ॲव्हेंजर्स फ्रँचायझीमधील पुढील चित्रपट दिग्दर्शित करावा. ज्यामध्ये ॲव्हेंजर्स: डूम्सडे आणि ॲव्हेंजर्स: सिक्रेट वॉर्स या दोन चित्रपटांचा समावेश असेल. एका रिपोर्टनुसार 'रुसो ब्रदर्स'ला या चित्रपटासाठी सुमारे 670 कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच त्यांना खासगी जेटसारख्या सुविधाही मिळणार आहेत. याआधी त्यांनी 'ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' 2018 आणि 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.


आयर्न मॅनने घेतली सर्वाधिक फी


रॉबर्ट हा MCU मधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. ॲव्हेंजर्स: एंडगेममधील त्याच्या पात्राच्या मृत्यूनंतर, रॉबर्ट आता मुख्य खलनायक डॉ. डूम म्हणून MCU मध्ये परत येणार आहे. याआधी त्याने चार ॲव्हेंजर्स चित्रपट, तीन आयर्न मॅन चित्रपट, कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर, द इनक्रेडिबल हल्क आणि स्पायडर-मॅन: होमकमिंगमधील कॅमिओसाठी 4,187 कोटी ते 5,024 कोटी रुपये शुल्क आकारले होते.


 कधी रिलीज होणार नवीन ॲव्हेंजर्स चित्रपट?


पुढच्या वर्षी ॲव्हेंजर्सचे प्री-प्रॉडक्शन सुरुवातीला सुरु होईल. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडनमध्ये होणार आहे. 1 मे 2026 ला ॲव्हेंजर्स: डूम्सडे चित्रपच प्रदर्शित होईल. तर 7 मे 2027 ला ॲव्हेंजर्स: सीक्रेट वॉर्स थिएटरमध्ये दाखल होणार आहे.