मुंबई :  सुमारे दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटावर निर्माता-दिग्दर्शक आर. माधवनने मोठा निर्णय घेतला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने तो फारसा खूश नसल्याचं मानलं जात आहे. किंबहुना, चित्रपटाला समीक्षकांनी प्रशंसा करूनही, प्रेक्षक अपेक्षेप्रमाणे चित्रपटगृहांमध्ये मोठ्या संख्येने पोहोचले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, चार आठवड्यांनंतर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या नियमामुळे, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची एंट्री कमी झाली आहे. त्यामुळे थिएटर मालक आणि निर्माते दोघंही नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा माधवनला ट्विटरवर विचारण्यात आलं की तुमचा चित्रपट ओटीटीवर कधी येणार आहे, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की, आता नाही. याचा अर्थ असा आहे की ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहण्याची अपेक्षा आहे, त्यांना निराश व्हावं लागेल.


बजेट रिकव्हरी नाही
या चित्रपटाचं बजेट 60 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात होतं. तर दोन आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 24 कोटींची कमाई करू शकला आहे. हे निराशाजनक आहे. कारण समीक्षकांनी चित्रपटाची खूप प्रशंसा केली होती. आजकाल, प्रेक्षकांना चांगला सिनेमा आणि चांगला आशय बघायचा आहे, असे बोललं जात असताना, लोकं रॉकेट्रीसाठी थिएटरमध्ये जात नाहीयेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


चांगला आशय फक्त म्हणण्यापुरता असतो आणि प्रेक्षक खरोखरच स्टार सिस्टीमशी बांधले जातात का? माधवनने दिलेले शब्द, मिळालेले रिव्ह्यू आणि भरपूर प्रमोशन रॉकेट्रीमध्ये व्यर्थ जात असल्याचं दिसतंय.


OTT वर चित्रपट कधी येणार
यावर्षी निर्मात्यांनी चित्रपटगृहात न चाललेले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केल्याचं दिसून आलं आहे. मात्र माधवनने वेगळी भूमिका साकारली आहे. इतरांच्या मार्गावर जाणार नाही, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे. अशा स्थितीत प्रेक्षकांना चांगला सिनेमा पाहायचा असेल तर रॉकेटसाठी थिएटरमध्ये जावं लागणार हे स्पष्ट झालं आहे.