Alia Bhatt and Karaj Johar : अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतक फक्त आलिया - रणबीरच नाही कपूर आणि भट्ट कुटुंबासोबतच चाहते देखील प्रचंड आनंदी आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चिमुकलीच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर अभिनेत्रीने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई झाल्यानंतर आलियाचा आगामी सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (rocky aur rani ki prem) लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. करण जोहरच्या दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. (rocky aur rani ki prem kahani alia bhatt)


करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत सिनेमाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा 28 एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित (rocky aur rani ki prem kahani release date) होणार आहे. पाहा करण जोहरची पोस्ट... 



'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत (ranvir singh) बॉलिवूडचे (bollywood) सर्वोत्तम कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील मुख्य भूमिकात दिसणार आहे. 


रणवीर आणि आलियाचे आगामी सिनेमे 
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'पूर्वी रणवीर सिंग 'सर्कस' सिनेमात दिसणार आहे. रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले आहे. तर आलिया भट्ट  'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे.