प्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, `सिंघम अगेन`चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक
`सिंघम अगेन` हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या `बाजीराव सिंघम`च्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, दिग्दर्शकाने `सिंघम अगेन`च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Singham Again Trailer Release Date: अजय देवगनच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चा होत आहे. अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दरम्यान, दिग्दर्शक रोहित शेट्टीने या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे. अजय देवगनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'सिंघम अगेन'चा ट्रेलर उद्या म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. रोहित शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटांची काही झलक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स' 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटाचा समावेश आहे.
रोहित शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?
रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कॉप युनिव्हर्स चित्रपटातील दृश्यांसह रोहित शेट्टीचा आवाज ऐकू येतो आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, 'आम्ही सुरुवात केली, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिले. आम्ही मनापासून मेहनत केली, तुम्ही आम्हाला मिठी मारली. सगळे घाबरले होते तेव्हा तूच माझ्या पाठीशी उभा होतास. तुम्ही आमच्या या विश्वाला एक कुटुंब बनवले आहे आणि सण हे फक्त कुटुंबासोबतच साजरे केले जातात, त्यामुळे या दिवाळीत भेटूया. 'सिंघम अगेन' यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती रोहित शेट्टीने या व्हिडीओमध्ये दिली आहे.
सिंघम अगेन चित्रपटाचे बजेट
'सिंघम अगेन' हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगनसह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.