`इश्क हो बेहिसाब सा...`, `जवान`च्या नव्या गाण्यात नयनतारासोबत रोमान्स करताना दिसला किंग खान
Jawan New Song: `जेलर` या चित्रपटातील `चलेया` हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील शाहरुखचं (Shahrukh Khan) हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Shahrukh Khan Nayantara New Song: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खाानचा जवान (Jawan) या चित्रपटाची त्याचे चाहते प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाच्या प्रीव्ह्यूपासून चित्रपटांची खूप प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाचा प्रीव्ह्यू पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी किंग खानवर त्यांच्या प्रेमाचा वर्षावर केला. त्यानंतर जेव्हा चित्रपटातील जिंदा बंदा हे गाणं प्रदर्शित झालं होतं. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्यासाठी 15 कोटी खर्च करण्यात आले होते. इतका मोठा बजेट असलेल्या या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात अभिनेत्री नयनतारा आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया देखील दिली आहे.
काही तासांपूर्वी शाहरुख खाननं (Shahrukh Khan) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका मागे एक अशी तीन पोस्ट शेअर केला आहे. त्यात शाहरुखचा नयनतारासोबत रोमॅन्टिक अंदाजा पाहायला मिळाला आहे. त्या व्हिडीओमध्ये गाणं 14 ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर शाहरुखं हा व्हिडीओ शेअर करत सांगितलं की 'जवानचं प्रेम, रोमॅन्टिक, जेंटल आणि स्वीट, चलेया सोमवारी येणार आहे. अनिरुद्ध तू जादुगार आहेस, फराह नेहमीप्रमाणे तुझ्यावर खूप प्रेम करतो. आदित्य तुझा आवाज खूप गोड आहे. प्रिया तुझ्या आवाजात मनाला शांती मिळते आमि चंद्रबोस यांचे लिरिक्त वाहत्या नदी प्रमाणे आहेत.' काही वेळापूर्वी शाहरुख खाननं एक पोस्ट शेअर करत गाणं शेअर केलं आहे. यात नयनतारा आणि त्याच्यात असलेली केमिस्ट्री पाहायला मिळते. हे गाणं शेअर करत 'इश्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा! असं हा जवानचं प्रेम', असं कॅप्शन त्यानं दिलं आहे.
'जवान' या चित्रपटातील आणि त्यातल्या त्यात 'चलेया' हे रोमॅन्टिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी शाहरुखला रोमान्स करताना पाहून आनंद होत असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.