फसवणूक करत न्यूड सीन केला शूट? बालकलाकारांचे दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप
जाणून घ्या या कलाकारांनी अवघ्या इतक्या वर्षांनंतर का केली तक्रार...
Romeo And Juliet Featuring Them Nude Actor Filed Case : जगभरात प्रेमाविषयी जेव्हा बोलतात तेव्हा सगळ्यांना आठवते ती 'रोमियो ज्युलियट' ची (Romeo And Juliet) जोडी. ते दोघे प्रेमाचे आदर्श आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या कहानीवर आतापर्यंत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. मात्र, फ्रेंको जेफिरेली (Franco Zeffirelli) यांच्या 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटातील न्यूड सीनवर आता कलाकारांनी आक्षेप घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मिती करणाऱ्या कंपनीवर 50 कोटी डॉलरच्या नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल केला आहे.
या चित्रपटात रोमियो आणि ज्युलियट यांची भूमिका साकारणारे ऑलिव्हिया हसी (Olivia Hussey) आणि लिओनार्ड व्हाइटिंग (Leonard Whitings) यांनी वयाच्या 15 आणि 16 व्या वर्षी या चित्रपटात काम केले. विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) यांच्या या ऑस्कर विजेत्या चित्रपटात काम करणारे ऑलिव्हिया हसी आणि लिओनार्ड व्हाइटिंग हे आज 71 आणि 72 वर्षांचे आहेत. आता या दोघांनी चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांच्याविरुद्ध लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात लैंगिक शोषण, लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको जेफिरेली यांचे निधन झाले आहे.
हेही वाचा : अश्लील हावभाव Deepika Padukone ला नडले, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल
दरम्यान, ऑलिव्हिया हसी आणि लिओनार्ड व्हाइटिंग यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, चित्रपटाच्या दिग्दर्शकानं त्यांना बेडरूमच्या सीनमध्ये तुम्ही दोघे अंडरगारमेंट घालू शकाल असे सांगितले होते. पण जेव्हा शूटिंगचा दिवस जवळ आला तेव्हा दिग्दर्शकानं सांगितलं की त्यांचा फक्त मेकअप केला जाईल आणि कॅमेऱ्याचा अॅंगल असा असेल की ते न्यूज आहेत हे दिसणार नाही. हे सगळं कळल्यानंतर त्या दोघांनी न्यूड सीन देण्यास होकार दिला. दरम्यान, यावेळी ऑलिव्हिया हसीचे स्तन आणि लिओनार्ड व्हाइटिंगचा बट शूट करण्यात आलाय. (Olivia Hussey and Leonard Whitings Bedroom Scene)
दरम्यान, त्याकाळात कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या गैरवर्तवणूक आणि शोषणाविरुद्ध कॅलिफोर्नियामध्ये खूप कडक कायदे होते. मुलांचे न्यूड सीन त्यांच्या संमतीशिवाय चुकीच्या पद्धतीनं शूट केल्याचा आरोप दिग्दर्शकावर आहे. यापूर्वी 2018 मध्ये मीडियाशी बोलताना ज्युलिएटची भूमिका साकारणारी ऑलिव्हिया हसीनं दिग्दर्शकाची स्तुती केली होती. फ्रेंको जेफिरेलीनं हा सीन खूप चांगल्या पद्धतीनं शूट केल्याचे म्हटले. (Director Franco Zeffirelli Is Already Dead)