अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन
बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे...
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे...
अभिनेता सलमान खान याने केलेलं वक्तव्य सलमानच्या चांगलंच अंगलट आलंय.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टायगर अभी जिंदा है च्या प्रमोशनच्या निमित्तानं एका खाजगी टीव्ही चॅनेलचा दिलेल्या मुलाखतीदरम्यान सलमाननं जातीवाचक शब्दप्रयोग केला होता. त्याचे पडसाद उमटू लागलेत.
सलमाननं याप्रकरणी तातडीनं माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं दिलाय.
रिपाईच्या कार्यकर्त्यांनी सलमानच्या वांद्रे पूर्वमधील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर निदर्शनं केली. रिपाईने सलमानला जाहीर माफी मागण्यासाठी २४ तासांची मुदत दिलीय.