RRR director S.S. rajamouli Tweet:  आरआरआर या चित्रपटातील लोकप्रिय गाणं नाटू नाटू (Naatu Naatu - Golden Globe) याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोबनं सन्मानित करण्यात आलं आहे. या गाण्याला एमएम किरावानी (M.M.Keeravani) यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. यावेळी या पुरस्कार सोहळ्याला एसएस राजमौली, संगीतकार एमएम किरावानी उपस्थित होते त्यावेळी या चित्रपटातील काही कलाकारांनी आणि दिग्दर्शक संगीतकारांनी अमेरिकेचे चित्रपट दिग्दर्शक स्टिवन स्पेनबर्ग यांची भेट घेतली. हा क्षण त्यांच्यासाठी सुवर्णक्षण होता. यावेळी पुरस्कार विजेत्या नाटू नाटू या गाण्याबद्दल स्टिवन यांनी खुद्द कलाकारांसमोरच कौतुक केले त्यावेळी राजमौलीदेखील उपस्थित होते. नाटू नाटूचं कौतुक ऐकताना राजमौली यांची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो स्वत: एस एस राजमौली यांनी ट्विट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉस एंजेलिसमध्ये चित्रपट दिग्गज स्टीव्हन स्पीलबर्ग यांना एस. एस राजमौली (S.S.Rajamouli) आणि चित्रपटाची टीम भेटली तेव्हा त्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. गोल्डन ग्लोब्समध्ये स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटानं म्हणजेच द फॅबेलमॅन्सने शोनं दोन मोठे पुरस्कार जिंकले. एक होता सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक खुद्द स्टीव्हन स्पीलबर्ग हे. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी आजपर्यंत अनेक जागतिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांचे नावं हे जगात आजही लखलखत्या सुर्याप्रमाणे आहे आणि खुद्द त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून आपल्या गाण्याचे कौतुक ऐकणं हे त्याच्यासाठी गोल्डन ग्लोबपेक्षाही मोठा आनंदाचा क्षण असेल असं म्हणायला हरकत नाही. 


RRR ला सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतल्या चित्रपट श्रेणीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते आता गोल्डन ग्लोब हा पुरस्कार आपला झाला आहे. आरआरआरचे डिरेक्टर एसएस राजामौली यांनी स्टीव्हन स्पीलबर्गसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, "मी नुकतीच देवाला भेटलो." यावेळी नाटू नाटू हे स्टिव्हन यांना प्रचंड आवडल्याचे त्यांनी यावेळी उघड केले. यासोबत एम एम करिवानी यांनीही ट्विट करून या क्षणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 



या चित्रपटानं सध्या अख्ख्या जगात इतिहास घडवला आहे. त्यांच्या या यशाने आता प्रत्येक भारतीय मनाला जिंकून घेतले आहे. परंतु या विजयानंतर एस एस राजमौलींचं एक वक्तव्यही चर्चेत होते ते म्हणजे आरआरआर हा चित्रपट भारतीय नसून तो एक तामिळ चित्रपट आहे. त्यावरून बराच वादंगही पेटला होता.