फक्त पॉकेटमनीसाठी सिनेमात करायचं होतं काम, पण मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर
आज ही अभिनेत्री बॉलीवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री बनली आहे.
Rukul Preet Singh Birthday Special: बॉलीवूडमधून सगळेच आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. त्यातून अनेक अभिनेत्रीही वेगवेगळ्या इच्छा घेऊन येतात. (Bollywood Actresses अशाच एका अभिनेत्रीची कथा तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जाईल. या अभिनेत्रीनं फक्त पॉकेटमनीसाठी आपला पहिला पिक्चर केला होता आणि आज ही अभिनेत्री बॉलीवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री बनली आहे. (rukul preet did first film for pocket money now competing bollywoods top herione)
ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Actress Rukul Preet Singh).साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. आज रकूलचा वाढदिवस आहे. ती आज 32 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलची ही एक इंटरेस्टिंग गोष्ट ज्याबद्दल अद्याप कुणालाच फारशी माहिती नसेल. (Rukul Preet Singh Birthday)
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
रकुल प्रीतनं आत्तापर्यंत हीटवर हीट सिनेमे केले आहेत. रकूलच्या नावाची ही एक गंमत आहे. खरे तर तिच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचे नाव त्यांच्या नावांना एकत्र करून नाव ठेवायचे होते. त्यामुळे वडील राजेंद्र आणि आई कुलविंदर यांच्या नावाचे नावं मिळून म्हणून तिचं नाव राकुल ठेवण्यात आले. त्यानंतर तिचं नाव रकूल झालं. (Rukul Preet Singh Name Story)
रकुल प्रीत सिंहने वयाच्या 10 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट तिनं केवळ पॉकेटमनीसाठी केला होता.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
रकुल प्रीत सिंह काही दिवसांपासून प्रसिद्ध निर्माता जॅकी भगनानीला (Jackie Bhagnani) डेट करत आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. रकुल प्रीत सिंह तिच्या एका चित्रपटासाठी 1.5 कोटी रुपये घेते. नुकताच तिचा 'कटपुतली' (Cuttputhali) हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला.
आयुष्मान खुरानासोबत 'डॉक्टर जी' (Doctor G) या चित्रपटात तिनं काम केले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण यांच्या ‘थँक गॉड’ (Thank God) आणि ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) या चित्रपटांतूनही ती प्रेक्षकांसमोर दिसणार आहे.