`रुस्तम` वर्दी लीलावप्रकरणी अक्षय कुमार आणि ट्विंकलला नोटीस
यूनिफॉर्म लिलावप्रकरणी अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि ऑक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
मुंबई : अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 1959 च्या नानावटी मर्डर केसवर हा चित्रपट आधारित आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या रुस्तम पावरीनं केलेल्या खुनाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये मात्र रुस्तम पावरी म्हणजेच अक्षय कुमारच्या यूनिफॉर्मवरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. यूनिफॉर्म लिलावप्रकरणी अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि ऑक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. कायदेशीर नोटीसमध्ये, अक्षय आणि ट्विंकलला या लिलावाने शक्य तितक्या लवकर थांबविण्यासाठी सांगण्यात आला आहे. यामध्ये २१ लोकांची नावे आहेत. यामध्ये ११ सर्विंग आर्मी अधिकारी, १ आयएएफ अधिकारी आणि ७ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सन्मानाच प्रतिक
हा केवळ युनिफॉर्म नाही तर सन्मान आणि बलिदानाच प्रतिक असल्याचे ऑफिसर संदीप अहलावत यांनी सांगितल. जर याचा लीलाव केला तर यांना कोर्टात खेचाव लागेल असेही संदीप यांनी सांगितले.
ट्विंकल खन्नाने दिलं संदीप यांना उत्तर
या लीलावातून मिळणारी रक्कम अॅनिमल वेल्फेयर सामाजिक संस्थेला देण्यात येणार असल्याचे ट्विंकल खन्नाने सांगितले. ही वर्दी लिलावात काढून पैसे गोळा करणाऱ्या महिलेला धमकी देण योग्य नाही. मी या धमक्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. हा लीलाव संपूर्ण १ महिना चालणार आहे.
वर्दीत चूका ?
दरम्यान रुस्तम सिनेमात परिधान केलेल्या वर्दीत आठ चुका असल्याचेही म्हटले जाते. १९५९ मधली कथा दाखवताना अक्षय कुमारच्या यूनिफॉर्ममध्ये दाखवण्यात आलेले स्टार्स हे नेव्हीच्या अधिकाऱ्यांना उशीरा देण्यात आलेले आहेत. संदीप उन्नीनाथन यांनी रुस्तममधल्या या चुका ट्विटरवर शेअर केल्या आहेत.